गाढवाच्या दूधाला दहा हजार रुपये लिटर भाव, तरीही लोक रांगा लावून घेऊ लागले, कारण….

0
846
प्रातिनिधिक छायाचित्र.

हिंगोलीः कधी कोणत्या गोष्टीला कसा भाव येईल, याचा काही नेम सांगता येत नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात तर एखादी गोष्ट रातोरात हिट होते आणि त्यासाठी लोक अक्षरशः रांगा लावतात. असेच काहीसे गाढवाच्या दूधाच्या बाबतीतही झाले आहे. मराठवाड्यातील जिल्ह्याचे शहर असलेल्या हिंगोलीमध्ये गाढवाचे दूध तब्बल दहा हजार रुपये लिटर विकले जाऊ लागले आहे आणि एवढे महागडे दूध घेण्यासाठी लोक रांगा लावत आहेत.

गाढवाचे दूध प्याल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कोरोनापासून बचाव होतो, असा प्रचार सोशल मीडियावर झाला आणि गाढवाचे हे दूध घेण्यासाठी लोक गर्दी करू लागले. रांगा लावून गाढवाचे दूध खरेदी करू लागले.त्यामुळे झाले असे की सुरूवातीला अत्यंत कमी असलेल्या गाढवाच्या दूधाचा भाव रातोरात दहा रुपये लिटरवर गेला. तरीही मोठ्या प्रमाणावर लोक या दूधाची खरेदी करत आहेत.

चला उद्योजक बनाः एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

हिंगोलीमध्ये अनेक जण रस्त्यावर फिरून गाढवाच्या दूधाची विक्री करत आहेत. एक चमचा गाढवाचे दूध प्या आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळवा, अशी हाळी देत हे दूध विक्रेते रस्तोरस्ती फिरताना दिसत आहेत. गाढवाचे एक चमचा दूध मुलांना पाजले तर त्याला न्यूमोनिया होत नाही. सर्दी, ताप आदी आजारांपासूनही संरक्षण मिळते. एवढेच काय मद्यपान करून खंगलेल्यांचीही रोगप्रतिकारशक्ती भक्कम होते, असे दावे हे दूध विक्रेते करू लागल्यामुळे गाढवाचे दूध चांगलाच भाव खाऊन गेले आहे.

गाढवाच्या एक लिटर दूधाला दहा हजार रुपये मोजणे प्रत्येकाच्याच आवक्यात नाही. बहुतांश जणांना एवढी मोठी रक्कम मोजणे अशक्य असल्यामुळे दूध विक्रेत्यांनी त्यावरही उपाय शोधला आहे. त्यांनी चमचाने गाढवाचे दूध विकण्यास सुरूवात केली आहे. एक चमचा दूधासाठी तब्बल १०० रुपये मोजावे लागत आहेत.

 गाढवाच्या दूधामुळे कोरोनापासून बचाव होतो, हा दावा डॉक्टरांना मात्र मान्य नाही. जर एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याने तत्काळ वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत. गाढवाचे दूध घेतले म्हणजे आपल्याला काहीही होणार नाही, या भ्रमात राहणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

रोज ७०० गाढवांच्या दूधाने आंघोळ करत होती इजिप्तची ही महाराणीः

क्लिओपात्रा ही रोमची सर्वात सुंदर महाराणी मानली जाते. आपले सौंदर्य आणि कामूक अदानी ती कुणालाही आपला दिवाना बनवत असे. ज्यूलियस सिझर आणि मार्क अँथोनीलाही आपला दिवाना बनवणारी इजिप्तची महाराणी क्लिओपात्रासारखी सुंदर त्वचा इसवी सनपूर्वा ३० मध्ये अलेक्झांड्रिया आणि इजिप्तमध्ये कोणत्याही महिलेची नव्हती,असे म्हटले जाते. क्लिओपात्रा आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी दररोज पाण्याऐवजी गाढवाच्या दूधाने आंघोळ करत असे. तिच्या एका आंघोळीसाठी तब्बल ७०० गाढवांचे दूध लागत असे. महाराणी क्लिओपात्राच्या आंघोळीसाठीच खास गाढवांचा ताफाच इजिप्तच्या राजवाड्यात होता, असे सांगितले जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा