विद्यापीठ अधिकाऱ्याच्या तोंडी टपोरी गुंडाची भाषाः डॉ. मंझा म्हणाले, ‘मादरxx तुला मारूनच टाकीन!’

0
822
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून २८ तदर्थ प्राध्यापकांच्या बोगस सेवासातत्याच्या प्रकरणामुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आता परिसरातील अधिकाऱ्यांच्या टपोरीपणामुळे चर्चेत आले आहे. ज्या विद्येच्या ‘पवित्र’ प्रांगणात विद्यार्थ्यांवर सुसंस्कृतपणा व शालीनतेचे संस्कार घडवले जाणे अपेक्षित असते, त्याच विद्येच्या प्रांगणात महत्वाच्या हुद्द्यावर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या तोंडी सडकछाप टपोरी गुंडाची भाषा बोलली जात असल्यामुळे आता या भाषेलाही ‘पावित्र्य’ प्राप्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी एका विद्यार्थी नेत्यास चक्क ‘ हरामखोर, मादरxxx तुला मारूनच टाकीन इथल्या इथे…’ अशा सडकछाप टपोरीगुंडाच्या भाषेत शिविगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी त्यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. आता विद्यार्थी संघटनाही डॉ. मंझा यांच्या या टपोरीपणाच्या निषेधार्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अमित कुटे हे २९ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांच्या कक्षात एका विद्यार्थीनीच्या एम.फिल.च्या नोटिफिकेशनबाबतची तक्रार घेऊन गेले होते. त्या विद्यार्थीनीने परीक्षा विभागाचे अनेक दिवस उंबरठे झिजवूनही तिचे एम. फिल.चे नोटिफिकेशन न निघाल्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी कुटे हे मंझा यांच्याकडे गेले होते. त्यावेळी मंझा यांनी तू कोणाची तरी चाकरी करायला आला आहेस का? असे मंझा हे कुटेंना म्हणाले. मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रदेश सरचिटणीस आहे आणि विद्यार्थीनी माझी बहीण आहे. तुम्ही चाकरी कसे म्हणता?  तुम्ही तुमच्या बायकोची आणि पोरीची काम करणे म्हणजे तुम्ही चाकरी समजता का? असा प्रतिप्रश्न कुटे यांनी मंझा यांना केला आणि मंझा यांच्यात लपून बसलेला सडकछाप टपोरी गुंड जागा झाला.

वाचा गणेश मंझांच्या भावाचेही कारनामेः ईश्वर मंझांची ‘चारसो बीसी’: हजेरी मस्टरवर स्वाक्षऱ्या करून खासगी खटल्यासाठी कोर्टात हजेरी

आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे चालणाऱ्या विद्यापीठात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्या खुर्चीवर बसलेलो आहोत, याचे भानही डॉ. गणेश मंझा यांना त्यांच्यातील जागा झालेल्या सडकछाप टपोरी गुंडाने राहू दिले नाही आणि त्यांनी अत्यंत खालच्या थराची भाषा वापरत कुटे यांना धमकावले. शिविगाळ करू नका, भाषा नीट वापरा, असे अमित कुटे हे डॉ. गणेश मंझा यांना वारंवार सांगत होते, परंतु डॉ. गणेश मंझा यांच्यातील जागा झालेला सडकछाप टपोरी गुंड काही थांबायचे नाव घेत नव्हता, त्यांनी अतिशय अश्लाघ्य आणि अर्वाच्च भाषेत अमित कुटे यांच्या आईबहिणीचा उद्धार केला. अमित कुटे यांनी या सर्व प्रकाराचा ऑडिओ आपल्य मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्याचे सर्वच रिपोर्ट वाचा एका क्लिकवर

विद्यापीठातील एका जबाबदार अधिकाऱ्याच्या तोंडी सडकछाप टपोरी गुंडाची भाषा ऐकून धक्का बसलेल्या अमित कुटे यांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठले आणि डॉ. गणेश मंझा यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलिसांनी एन.सी. क्रमांक ३३४/२०२२ कलम ५०४, ५०६ भादंवि अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अमित कुटे आणि डॉ. गणेश मंझा यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप न्यूजटाऊनकडे उपलब्ध आहेत. त्यातील संवाद असा…

अमित कुटेः नियमांनीच करा, आम्ही संस्कारित लोकं आहोत.

डॉ. गणेश मंझाः जास्त भाषण नको, मला ऐकायचे नाही..

अमित कुटेः तुमचं भाषण मी ऐकत नाही.

डॉ. गणेश मंझाः तुम्हा द्या असे ऑथंटिकेट काही पत्र आणलं का तुम्ही..

अमित कुटेः मी काय सांगतोय, तुम्ही कँडिडेटकडे द्या. माझी बहीण म्हणून मी इथे आलोय. बहिणीची चाकरी…तुम्ही तुमच्या बायकोची आणि पोरीची चाकरी समजता का?

(अमित कुटे यांचा हा प्रतिप्रश्न ऐकून डॉ. गणेश मंझा यांचा पारा चढला आणि ते सडकछाप टपोरी गुंड बोलतात, त्या भाषेवर उतरले.)

डॉ. गणेश मंझाः ऐ…हरामखोर, बोलू नको जास्त… बोलवं रे त्या सेक्युरिटी गार्डला.. सांग म्हणावं याला समजून. मादरxxx बहीण न् भाऊ काढू लागला. कोणी शिकवलं रे तुला?

अमित कुटेः अहो सर मी माझ्या बहिणीसाठी आलो अन् तुम्ही म्हणता मी चाकरी करण्यासाठी आलो..

डॉ. गणेश मंझाः बाहेर हो आधी… बाहेर हो आधी. माझी बहीण न् हे काढलं ना. मारून टाकीन मी तुला इथल्या इथे. नालायक साला. तुझ्या बहिणीचे नोटिफिकेशन तू आला कशाला माझ्याकडे.. कश्याला आला माझ्याकडे?  सन्मानाने बसवलं मादरxxxला..दिलं सगळं. मला कागद लागलं की नाही द्यायला तुझ्याकडे.

अमित कुटेः अहो सर ती माझी बहीण आहे, म्हणून मी आलो तुमच्याकडे तरी तुम्ही म्हणता की मी चाकरी करायला आलो…

डॉ. गणेश मंझाः रोज सालं देवाला प्रार्थना करून येतो की नको, आजचा दिवस छान गेला पाहिजे…येतातच खड्डे खोदून आपल्याकडे…

डॉ. गणेश मंझा आणि अमित कुटे यांच्यात झालेल्या संवादाची हीच ती ऑडिओ क्लिप

डॉ. गणेश मंझा ऑडिओ क्लिप

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

डॉ. गणेश मंझा यांच्या तोंडीची ही ‘पवित्र’ शब्दसुमने ऐकून धक्का बसलेले अमित कुटे यांनी काही सहकारी घेऊन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेतली. त्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. हे प्रकरण वाढतेय, हे लक्षात येताच डॉ. गणेश मंझा यांनी नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या काही खास पंटरच्या कानी हा प्रकार घातला. त्यानंतर अमित कुटे यांना जवळपास तीस-पस्तीस धमकीवजा फोन आले. तरीही ते मागे हटले नाहीत. आता बेगमपुरा पोलिस ठाण्यात मंझांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. आता विद्यार्थी संघटनाही आंदोलनाच्या पवित्र्यात असून मंझा यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा