यथा राजा तथा प्रजाः शिक्षणशास्त्राच्या उज्ज्वला भडांगेंनी मागितली पीएचडीच्या विद्यार्थिनीला लाच

0
1165
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील २८ तदर्थ प्राध्यापकांना नियमबाह्यपणे सरकारी जावई करून घेण्याचे प्रकरण गाजत असतानाच विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापिका उज्ज्वला भडांगे यांनी एका पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थीनीला ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण पुढे आले आहे. प्रारंभी ही विद्यार्थीनी कुलगुरूंकडे तक्रार घेऊन गेली. पण कुलगुरूंनी तिला मी काहीच करू शकत नाही, तुला काय करायचे ते कर असे सांगून हाकलून लावल्यानंतर त्या विद्यार्थीनीने बेगमपुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ज्यांच्याविषयी ही तक्रार आहे, त्या डॉ. उज्ज्वला भडांगे यांच्या नियमबाह्य नियुक्तीचा भंडाफोड न्यूजटाऊनने केला होता. त्यावेळी त्यांनी त्यांची निवड गुणवत्तेवरच झाल्याच्या दावा करत न्यूजटाऊनशी त्यांच्या पतीशीही बोलणे करून दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली करत असल्याच्या दावा करणाऱ्या त्यांच्या पतीने बदनामी केली म्हणून नोटीस देण्याची धमकीही दिली होती. न्यूजटाऊनला आजपर्यंत ती नोटीस मिळाली नाही. भडांगेच्या लाचखोरीचा हा पहिला पुरावा….

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा