डॉ. बामुच्या शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. भडांगे निलंबित, तुम्हालाही मागतात का तुमचे गाईड पैसे?

0
364
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः संशोधक विद्यार्थिनीला ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला भडांगे यांना गुरूवारी निलंबित करण्यात आले. भडांगे यांच्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे विद्यापीठातील संशोधन प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

डॉ. भडांगे यांची विद्यापीठातील नियुक्तीच नियमबाह्य आहे. त्यांच्या बेकायदेशीर नियुक्तीचा पर्दाफाश न्यूजटाऊनने यापूर्वीच केला आहे. त्याच भडांगेंना आता संशोधक विद्यार्थिनीला ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाला निलंबित करावे लागले आहे. भडांगे यांनी संशोधक विद्यार्थिनीकडे पैसे मागितल्यामुळे विद्यापीठातील संशोधन प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पीएच.डी.चे गाईड संशोधक विद्यार्थ्यांकडे पैश्यांची मागणी करतात, घरगड्यासारखे राबवून घेतात, काही गाईड तर त्याही पुढे जाऊन नको ते उद्योग करतात, अशा चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठ वर्तुळात उघडपणे होत होती. डॉ. भडांगे यांचे लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे त्या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.

हेही वाचाः यथा राजा तथा प्रजाः शिक्षणशास्त्राच्या उज्ज्वला भडांगेंनी मागितली पीएचडीच्या विद्यार्थिनीला लाच

डॉ. उज्ज्वला भडांगे यांच्या नियमबाह्य नियुक्तीचे स्पेशल रिपोर्ट वाचा:

‘उज्वल’ तदर्थता: निकषांच्या कसोटीवर पासंगभरही नसताना प्रा. भडांगेंची सहयोगी प्राध्यापकपदी वर्णी!

प्रा. डॉ. भडांगेंचे ‘शिक्षणशास्त्र’ स्वयं अर्थसहाय्यित, तरीही सरकारी तिजोरीतून वेतन देण्याचा खटाटोप!

 पीएच.डी.ची गाईडशिप मिळवण्यासाठी विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर लॉबिंग करतात आणि एकदा गाईडशिप मिळाली की  संशोधनाच्या नावाखाली काय उद्योग करतात, हे डॉ. भडांगे यांच्यानिमित्ताने समोर आले आहे. अर्थात पीएच.डी.चे गाईड असलेले सर्वच प्राध्यापक असे उद्योग करतात, असे नाही. प्रामाणिकपणे संशोधन करवून घेणारे काही प्राध्यापक आहेत. परंतु भडांगे यांच्यासारख्या पात्रता नसलेल्या लोकांना उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेत एन्ट्री दिल्यामुळे विद्यापीठातील संशोधन आणि संशोधनाची एकूणच प्रक्रिया लाचखोरीच्या बजबजपुरीत सापडली आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हालाही मागतात का तुमचे गाईड पैसे?: भडांगे प्रकरणामुळे संशोधन प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि लाचखोरी समोर आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेची स्वच्छता मोहीम हाती घेण्याची आता गरज निर्माण झाली असून न्यूजटाऊन या मोहिमेत पुढाकार घेत आहे. ज्या संशोधक विद्यार्थ्यांना त्यांचे गाईड, विभागप्रमुख पैसे मागतात, घरगड्यासारखे राबवून घेतात किंवा अन्य मार्गाने शोषण करतात, अशा संशोधक विद्यार्थ्यांनी सविस्तर तपशीलासह न्यूजटाऊनकडे  माहिती द्यावी. तक्रारदार संशोधक विद्यार्थी/विद्यार्थीनीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. संपर्कः ई-मेल: m.newstown@gmail.com, व्हॉट्सअप क्रमांकः 9823427325

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा