बाबा आमटेंच्या नात डॉ. शीतल आमटे यांची आनंदवनात आत्महत्या

0
2089
संग्रहित छायाचित्र.

चंद्रपूरः बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांच्या कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी आत्महत्या केली. झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.

डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी शीतल यांनी सोशल मीडियावर एक चित्रफित जारी करून आनंदवनातील कार्यकर्ते आणि कुटुंबातील सदस्यांवरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच ही चित्रफित हटवण्यात आली होती.

हेही वाचाः ‘पदवीधर, शिक्षक’ निवडणुकीचे निकाल सांगणार ठाकरे सरकारची लोकप्रियता, भाजपची पत!

 दरम्यान, आत्महत्येपूर्वी डॉ. शीतल आमटे यांनी एक ट्विट केले होते. त्यात युद्ध आणि शांतता असे कॅप्शन देऊन अक्रिलिक कॅन्व्हॉसवर रेखाटलेले एक रेखाचित्र शेअर केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा