फडणवीस सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झालाः पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांचा गौप्यस्फोट

0
654
छायाचित्रः twitter/@dhananjay_munde

अहमदनगरः गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला प्रचंड अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला, असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात बहुजन समाजातील अधिकाऱ्यांना हेतुतः त्रास दिला जात होता का?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे संत भगवानबाबा पुण्यतिथीनिमित्त संत वामनभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. लहाने यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यावेळी बोलताना डॉ. लहाने यांनी हा गौप्यस्फोट केला.

हेही वाचाः नव्या कृषी कायद्यांवर शरद पवारांनी मांडले परखड मत, वाचा मुद्देसूद सांगितलेले असे मोठे धोके…

लातूर जिल्ह्यातील मकेगाव येथे जन्मलेले डॉ. लहाने हे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ असून बिनटाक्याच्या नेत्रशस्त्रक्रियेसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजवर सुमारे  १ लाख ३५ हजार नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असून व्रतस्थ भावनेने त्यांनी यासाठी कधी कधी १८ ते २३ तास काम केले आहे. अशा व्रतस्थ सेवाभाव असलेल्या डॉ. लहाने सारख्यांना फडणवीस सरकारच्या काळात अडचणी का आणण्यात आल्या? आणि त्यांना त्रास का देण्यात आला? असे सवाल यानिमित्ताने आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

हेही वाचाः ‘राष्ट्रपती महोदय, आरएसएसने १५ ऑगस्ट १९४७ रोजी काळा दिवस पाळला त्याचा निषेध का नाही?’

धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. मागील सरकारच्या सत्ताकाळात मला मोठ्या अडचणी आल्या. मी प्रचंड त्रास सहन केला. केवळ नातेवाई किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकरले आहे आणि याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मला मोलाची मदत केली, असेही डॉ. लहाने यावेळी म्हणाले.

हेही वाचाः अजित पवार म्हणालेः राजकारणात येण्याच्या भानगडीत पडू नका, मी इथे आलो आणि अडकलो!

डॉ. तात्याराव लहाने यांचे कार्य महान असून त्यापुढे पद्मश्री पुरस्कारसुद्धा छोटा वाटतो. डॉ. लहाने हे आमच्या परळीचे जावई असल्याने ते कायमच आदरस्थानी आहेत, असे मुंडे म्हणाले. लाखोंचे दृष्टिदाते डॉ. लहाने यांना माझ्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देणे हे माझे भाग्यच आहे, असेही मुंडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा