रायपूर: राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) लोक हिटलर आणि मुसोलिनीला आपला आदर्श मानतात. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन ते काळी टोपी आणि खाकी पँट घालतात आणि ड्रम वाजवतात. ही ना भारताची वेशभूषा आहे, ना भारताची संगीतवाद्य,असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी रायपूरच्या राजीव भवनमध्ये आयोजित व्याख्यानात बघेल यांनी आरएसएसवर सडकून टीका केली. ज्या मुसोलिनींना भेटण्यासाठी जगभरातील लोक तरसत होते, ते मुसोलिनी कधीच कुणाच्या सन्मानार्थ उभा रहात नव्हते. कुणी त्यांच्याशी नजरेला नजर देऊन बोलत नव्हते. तेच मुसोलिनी नेहरूंना भेटू इच्छित होता, मात्र नेहरू विमानात बसून राहिले, पण मुसोलिनींना भेटले नव्हते. जे लोक आज नेहरूंची ऊंची कमी करू पहात आहेत, ते लोकशाही कमकुवत करू इच्छित आहेत. नेहरूंनी जी लक्ष्मणरेखा ओढली होती, तेथपर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय बाब असल्यामुळेच ते नेहरूंची ऊंची कमी करू पहात आहेत. आमचे नेते आपल्या विचारांवर नेहमीच ठाम राहिले आहेत. त्यांनी ब्रिटिश राजवटीत तुरूंगात जाणे पसंत केले. तुमच्या कायद्यात आणखी कठोर शिक्षा असेल तर मला द्या, कारण मी गुन्हा केला आहे, असे गांधीजी म्हणत होते. हे गांधी आणि नेहरूंचे विचार आहेत. दुसरीकडे बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी देशभर रथ घेऊन गेले आणि बाबरी मशीद मी पाडली नसल्याचे सांगत फिरले. सत्य सांगण्याचे धाडस त्यांच्यात नाही. भाजपचे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी देशात आग लावण्याचे काम करतात, असे बघेल म्हणाले.
आरएसएसची ना वेशभूषा भारतीय, ना वाद्य भारतीय!
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) लोक हिटलर आणि मुसोलिनीला आपला आदर्श मानतात. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन ते काळी टोपी आणि खाकी पँट घालतात आणि ड्रम वाजवतात. ही ना भारताची वेशभूषा आहे, ना भारताचे संगीतवाद्य!