मी तुझ्याकडून गुपचुप गांजा घेईनः अनन्या पांडे- आर्यन खानमधील कथित व्हॉट्सअप चॅट समोर

0
327
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि ड्रग्ज प्रकरणातच चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या अनन्या पांडे या दोघांमधील कथील व्हॉट्सअप चॅटचा काही भाग समोर आला आहे. या दोघांमध्ये कथितरित्या अंमली पदार्थाविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. एनसीबीने हे कथित व्हॉट्सअप चॅट न्यायालयात सादर केले आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

२२ वर्षीय अनन्या पांडे २०१९ मध्ये चित्रपटसृष्टीत आली. ती अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान चांगले मित्र आहेत. एनसीबीने या कथित व्हॉट्सअप चॅटबद्दल आतापर्यंत अनन्या पांडेची दोन फेऱ्यांत चौकशी केली आहे. या दोघांनीही व्हॉट्सअपवर ड्रग्जबाबत चॅटिंग केल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबी अनन्या पांडेची पुरवठादार म्हणून चौकशी करत आहे. तिने चॅटिंगमध्ये ड्रग्जच्या बाबतीतील भाष्य केले. तेव्हा आर्यन खान म्हणाला, मी तुमच्याकडून गुपचुप घेईन आणि अनन्याने ठीक आहे, असे उत्तर दिले.

एनसीबीच्या म्हणण्यानुसार अनन्या पांडे आर्यन खानला अल्प प्रमाणात पुरवठा करणा होती, असे प्रथमदर्शनी दिसते. त्याच तारखेच्या दुसऱ्या चॅटमध्ये अनन्याने आर्यनला मी आता व्यवसायात आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे एनसीबी अनन्याची पुरवठादार म्हणून चौकशी करत आहे. दोघांमधील हे व्हॉट्सअप चॅटिंग २०१९ मधील असल्याचे सांगितले जाते. पण या व्हॉट्सअप चॅटची पुष्टी झालेली आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा