ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

0
162
संग्रहित छायाचित्र.

पुणेः क्रूझवरील वादग्रस्त ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी चर्चेत आला होता. पुणे पोलिसांनी त्याला फसवणुकीच्या एका प्रकरणात अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरण गोसावी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

 नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक केल्याचा किरण गोसावीवर आरोप असून त्याच्या विरोधात पुण्याच्या फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वादग्रस्त ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर किरण गोसावीने लखनऊमध्ये शरणागती पत्करणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. त्यामुळे त्याचा शोध घेत पुणे पोलिसांचे एक पथक लखनऊलाही जाऊन आले होते.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

किरण गोसावीला फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्याला कुठून ताब्यात घेतले हे आम्ही सांगू शकत नाही. काही वेळातच त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

ड्रग्ज पार्टी प्रकरणात साक्षीदार बनलेला किरण गोसावी याचा अंगरक्षक प्रभाकर साईलने गंभीर आरोप केले होते. आर्यन खानच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरूख खानकडे किरण गोसावीने २५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी ८ कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांना मिळणार होते, असा खळबळजनक आरोप प्रभाकर साईलने केला होता. आता किरण गोसावीच्या अटकेनंतर आर्यन खान प्रकरणात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर किरण गोसावीने त्याच्यासोबत सेल्फी काढली होती. या सेल्फीमुळे तो चर्चेत आला होता.

अटकेपूर्वी जारी केला व्हिडीओ, म्हणाला…. दरम्यान, किरण गोसावीने त्याच्या अटकेपूर्वी एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात त्याने त्याच्यावर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलची चौकशी करण्याची मागणी केली आहे. किमान एक मंत्री किंवा विरोधी पक्षातील एका तरी नेत्याने माझ्या पाठीशी उभे रहावे, असेही त्याने म्हटले आहे. मी प्रभाकर साईलविषयी काही बोलू इच्छितो. सॅम डिझूसासोबत कोणाचे संभाषण झाले? किती पैसे कोणी घेतले? प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत किती ऑफर आल्या आहेत? त्याच्या मोबाईलमधून स्पष्टपणे समजेल. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन्ही भावांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाईल संभाषण काढावे, अशी मागणी किरण गोसावीने केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा