‘होय मी भंगारवालाच, सगळ्या भंगाराचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकल्याशिवाय थांबणार नाही!’

0
189
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः होय मी भंगारवाला आहे. भंगारवाल्याची किमयागिरी काय असते, हे  या लोकांना माहीत नाही. जी वस्तू उपयोगी नसते ती उचलून आणतो. त्याचे तुकडे तुकडे करून पाणी पाणी करण्याचे काम भंगारवाला करतो. नवाब मलिक या शहरात जेवढे भंगार आहेत, त्याचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि त्याचे पाणी केल्याशिवाय थांबवणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

 भाजप नेते मोहीत कम्बोज यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. त्याबाबत विचारले असता मलिक म्हणाले की, माझी औकात तर इतकी आहेच नाही. माझा ब्रँड त्यांनी १०० कोटींचा केला आहे. ते सांगतात भंगारवाले… पण भंगारवाला काय असतो… होय मी भंगारवालाच आहे. माझे वडिल कपडे आणि भंगारचा व्यवसाय करायचे. वयाच्या १६ व्या वर्षांपासून ते राजकारणात आमदार होईपर्यंत मी पण भंगारचाच व्यवसाय करत होतो. शेजारीच आमचे दुकान आहे. जाताना त्याचे फोटोही काढा. माझे कुटुंब भंगारचा व्यवसाय करते, याचा मला अभिमान आहे, असेही मलिक म्हणाले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

माझ्या आजोबांनी कधीही बनारसमध्ये कोणत्याही डाकूंकडून सोने घेतले नाही. माझ्या वडिलांनी चोरांकडून सोने खरेदी केले नाही. मी कधीही मुंबईत सोन्याची तस्करी केली नाही. मी कोणतेही मार्केट बुडवले नाही. कोणत्याही बँकांचे पैसे खाल्ले नाहीत. मी कंपन्या निर्माण करून बँकांचे शेकडो कोटी बुडवले नाहीत. माझ्या घरी कधीही सीबीआयने धाड टाकलेली नाही. माझ्यावर कोणताही आरोप नाही. मुख्यमंत्री निधीत मी कधीही चेक बाऊन्स केला नाही, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

किरण गोसावी आणि भाजप नेत्याची पार्टनरशिपः किरण गोसावी आणि भाजपचे एक नेते यंची पार्टनरशिप आहे. त्यांची बायको एका कंपनीत पार्टनर आहे. विधानसभेत हे सगळे सांगू. जो बोगस, फर्जी माणूस आहे त्यांची नोकरी जाणे आणि तुरूंगात टाकणे तसेच या राज्यातील निरपराध लोक बाहेर येत नाहीत. सगळी प्रकरणे बोगस असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. पोपटाला वाचवण्यासाठी सगळे सगळे लोक पुढे पुढे पळत आहेत. विधानसभेत परिस्थिती समोर आल्यानंतर यांना महाराष्ट्रात तोंड दाखवण्यासारखी परिस्थिती राहणार नाही, असा इशाराही मलिक यांनी भाजपला दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा