भूकंपाच्या धक्क्यांनी सातारा हादरले, रिश्टर स्केलवर ३.३ तीव्रतेची नोंद

0
279
छायाचित्र सौजन्यः twitter/NCS

साताराः पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या काही भागाला आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ही माहिती दिली. या भूकंपाच्या धक्क्यांनी नुकसान झाले किंवा नाही, याची कोणतीही माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण तालुक्यात जमिनीखाली ५ किलोमीटर खोलवर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरातील भागामध्ये भूकंपाचा हा सौम्य धक्के जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ नोंदवण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत कोयना धरण परिसरात बसलेला हा भूकंपाचा तिसरा धक्का आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांत भीती आणि चिंतेचे वातावरण आहे.

 कोयनानगर, पोफळी, अलोरे परिसरात भूकंपाचा हा धक्का जाणवला. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहचला नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या पाटण तालुक्यात कोठेही पडझड झाली नसल्याचे पाटण तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा