मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावरच आता ईडीची कारवाईः ठाण्याच्या ‘निलांबरी’मधील ११ सदनिका जप्त

0
136
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः केंद्रातील भाजप सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असतानाच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली. ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंटमधील ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीने पाटणकरांच्या पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीजशी संबंधित साडेसहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. पाटणकरांवरील ईडीची कारवाई ही महाविकास आघाडीला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का देणारी ठरली आहे.

आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचेच मंत्री ईडीच्या रडारवर होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली. सध्या ते तुरूंगात आहेत. ईडीच्या या कारवाईवरून महाविकास आघाडीने भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग केल्याचा आरोप केला आहे. मात्र आता ईडीने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांवरच कारवाईचे हत्यार उपसले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे सख्खे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. ठाण्याच्या वर्तक नगर भागातील निलांबरी अपार्टमेंटमधील निलांबरी अपार्टमेंटमधील एकूण ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. या सदनिका आणि जप्त केलेल्या एकूण मालमत्तांची किंमत ६.५ कोटी रुपये असल्याची माहिती ईडीने दिली.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ठाण्याच्या वर्तक नगर भागातील निलांबरी अपार्टमेंट हा गृहनिर्माण प्रकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्माण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आहे. महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि पटेल कुटुंबीयांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीजच्या मेसर्स पुष्पक बुलियन्स या कंपनीने निलांबरी अपार्टमेंटमध्ये ११ सदनिका खरेदी केल्या होत्या. पुष्पक ग्रुपने नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मेसर्स महसफर डिलर प्रायव्हेट लिमिटेड या शेल कंपनीच्या माध्यमातू पाटणकरांच्या कंपनीला विनातारण ३० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप आहे. त्याच प्रकरणात ईडीने आज निलांबरी अपार्टमेंटमधील ११ सदनिकांवर जप्तीची कारवाई केली आहे. भविष्यात या प्रकरणी श्रीधर पाटणकरांचीही ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याआधी ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी पुष्पक बुलियन आणि पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात ६ मार्च २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. या ग्रुपच्या मालकीची २१ कोटी ४६ लाख रुपये किंमतीची मालमत्ताही जप्त केली होती.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

शरद पवारांनी उडवली ईडीची खिल्लीः मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकरांशी संबंधित मालमत्तांवर केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीची खिल्ली उडवली आहे. पाच दहा वर्षांपूर्वी लोकांना ईडी नावाची संस्था माहीतही नव्हती. मग ती संस्था काय काम करते, ही तर फारच लांबची गोष्ट. पण आता कुणाला तरी टार्गेट करायचे, कुणाला तरी त्रास द्यायचा म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. त्यामुळे ही ईडी आता गावागावात गेली आहे, अशा शब्दांत पवारांनी ईडीची खिल्ली उडवली. ते बारामतीत बोलत होते. राजकीय किंवा अन्य हेतूने कुणाला तरी त्रास देण्यासाठीच हा कार्यक्रम हाती  घेण्यात आला आहे, हे आकडेवारी स्पष्ट सांगतेय, असेही पवार म्हणाले.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

सनसनाटी निर्माण करण्यासाठीच कारवाईः ही कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो, हे राजकीय विरोधकांना दाखवण्यासाठी जेथे जेथे भाजपची सत्ता नाही, अशा प्रत्येक राज्यात अशा कारवायांना ऊत आला आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा