भगव्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा वापरली, राज्य निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस

0
241
छायाचित्र सौजन्यः मनसे

मुंबईः शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा वादात सापडला असून निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कारणे दाखवा नोटीस बाजवून पक्षावर कारवाईचा इशारा दिला आहे.

मनसेने मुंबईत नुकत्याच झालेल्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात आपला झेंडा बदलून बदलत्या राजकीय भूमिकेची सुरूवात केली होती. आधीचा चौरंगी झेंडा बदलून पूर्णतः भगवा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असा नवा झेंडा स्वीकारला होता. या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा वापरण्यास संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघासह अन्य काही संघटनांनी आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपल्या विरोधात आलेल्या तक्रारींवरून पक्षाविरुद्ध कारवाई का करू नये, अशी विचारणा त्यात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा