पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूकः असे करा मतदान, नाही तर मतपत्रिका होईल बाद !

1
436
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या १ ‍डिसेबंर रोजी  मराठवाड्यातील आठही जिल्हयात मतदान होणार आहे. यावेळी मतदान करताना पदवीधर मतदारांना मतपत्रिकेवर सर्व पसंतीक्रम आकड्यात लिहिणे बंधनकारक असून मतपत्रिकेवर पहिला पसंतीक्रम न लिहिता अन्य पसंतीक्रम लिहिल्यास मतपत्रिका बाद होणार आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतदानावेळीही हीच नियमावली लागू असणार आहे.

या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी योग्य पध्दतीने मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदान करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवून मतदान करावे याविषयी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या अशाः

  • मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळया रंगाचा स्केच पेनचाच वापर करावा. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपाँईट पेन यांचा वापर करु नये.
  • ज्या उमेदवारास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्यासाठी निवडले आहे. त्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रम (Oredr of Preference) असे नमूद केलेल्या रकान्यात ‘१’ हा अंक नमूद करून मतदान करावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एकापेक्षा जास्त असली तरी ‘१’ हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्या नावासमोर नमूद करावा.
  • निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदवता येतील. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम २,३,४ इत्यादी अंक तुमच्या पसंतीक्रमानुसार ‘पसंतीक्रम’ (Oredr of Preference) या स्तंभामध्ये दर्शवा.
  • कोणत्याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करणे गरजेचे आहे. एकच अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर नमुद करु नये.
  • पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शवला जाईल. उदा.१,२,३ इत्यादी आणि तो एक, दोन, तीन इत्यादी असा शब्दात दर्शवू नये.
  • अंक हे भारतीय आंतरराष्ट्रीय अंक स्वरुपात जसे १,२,३ इत्यादी किंवा रोमन स्वरूपातील I,II,III इत्यादी किंवा संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील भारतीय भाषेतील अंकाच्या स्वरुपात नोंदवता येतील.
  • मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करु नये. अंगठयाचा ठसा उमटवू नये.
  • तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर ( √)(X)अशी खुण करू नये. अशी मतपत्रिका बाद ठरेल.
  • तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी उमेदवारांपैकी एकाच्या नावासमोर ‘१’ हा अंक नमूद करून तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्वरूपाचे असून ते अनिवार्य नाहीत, असे निवडणूक निर्णय अधिकारी -५ औरंगाबाद पदवीधर मतदासंघ यांच्याकडून कळवण्यात आले आहे.

एक प्रतिक्रिया

  1. मी पदवीधर मतदार मी सध्या रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फ़ोर्स मधे आहे आणि मि गुजरात सूरत येथे नोकरी करत आहे तर मला ऑनलाइन पद्धतीने मतदान या अजुन कोणत्या पद्धतीने मतदान करता येत नाही का? कलवावे माज़ा मोबाइल क्रमांक 9860937950

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा