मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी १ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी

0
232
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान घेतले जाणार आहे, अशी माहिती औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना ५ नोव्हेंबर रोजी जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १२ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छानणी १३ नोव्हेंबर  रोजी केली जाणार आहे. उमेदवारांना १७ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल मागे घेता येतील.

या मतदारसंघात १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळात मतदान घेतले जाणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया ७ डिसेंबर रोजी संपणार असल्याचेही केंद्रेकर म्हणाले.

 कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घेतली जात असल्यामुळे या निवडणुकीसाठी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे अशा नियमांचे मतदारांना पालन करावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा