लेणींसाठी प्रसिद्ध वेरूळ होणार ‘पुस्तकाचे गाव’, औदुंबर, नवेगाव बांध आणि पोंभुर्लेचाही समावेश

0
56
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः औरंगाबादपासून ३० किलोमीटर अंतरावरील वेरूळ हे गाव लेणींसाठी जगप्रसिद्ध आहे. लेणींसाठी जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवणारे वेरूळ आता ‘पुस्तकाचे गाव’ अशी नवी ओळख धारण करणार आहे. सातारा जिल्ह्यातील भिलारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील चार नवी गावे ‘पुस्तकांची गावे’ ठरणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील औंदुंबर, मराठवाड्यातील वेरूळ, विदर्भातील नवेगाव बांध आणि कोकणातील पोंभुर्ले ही नवीन चार गावे पुस्तकांची गावे म्हणून सजणार आहेत.

वेल्समधील ‘व्हिलेज ऑफ बुक्स’ या संकल्पनेच्या धर्तीवर सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील भिलार हे गाव महाराष्ट्रातील पहिले ‘पुस्तकाचे गाव’ ठरले. ४ मे २०१७ रोजी भिलारमध्ये अंमलात आणलेल्या संकल्पनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक ‘पुस्तकाचे गाव’ सुरू करण्यात येणार आहे.

 या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून प्रत्येकी एका गावाची निवड करण्यात आली आहे. पुणे महसूल विभागातून सांगली जिल्ह्यातील औदुंबर, औरंगाबाद महसूल विभागातून औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ, नागपूर महसूल विभागातून गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध आणि कोकण महसूल विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या चार गावांची निवड करण्यात आली आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘पुस्तकाचे गाव’ योजनेअंतर्गत या गावांमध्ये विविध प्रकारचे साहित्य, कथा, कांदबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णने आदी ग्रंथांनी सुसज्ज अशी भव्यदिव्य दालने उभारली जाणार आहेत. पुस्तकांचे गावच्या उभारणीत स्थानिक गावकऱ्यांचाच सहभाग घेतला जाणार आहे. ‘पुस्तकाचे गाव’ संकल्पनेमुळे मराठी भाषा आणि साहित्याचे जतन, प्रचार व प्रचाराबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, अशी या संकल्पनेमागची मूळ भूमिका आहे.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

औरंगाबादपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळमध्ये सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२ बौद्ध आणि ५ जैन लेणी आहेत. १९८३ मध्ये युनेस्कोने वेरूळ लेणींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. या लेणी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक वेरूळला येतात. आता ‘पुस्तकांचे गाव’मुळे वेरूळला नवीन ओळख मिळणार असून वेरूळच्या लौकिकात आणखीच भर पडणार आहे. वेरूळला जशी लेणींमुळे प्राचीन वारसा लाभला आहे, तसाच साहित्याचाही वारसा लाभलेला आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर तेराव्या शतकात वेरूळच्या गुंफामध्ये वास्तव्य करून होते, असा उल्लेख स्थानपोथीमध्ये आहे.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा