घोड्यावर बसून ऑफिसला येऊ का? कर्मचाऱ्याने मागितली जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी

0
804
प्रातिनिधिक छायाचित्र.

नांदेडः एकीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आणि वाहने चावलणे मुश्कील झालेले असतानाच नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांने कार्यालयालयात घोड्यावर येऊ देण्याची आणि कार्यालय परिसरात घोडा बांधू देण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे.

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सतीश पंजाबराव देशमुख हे रोजगार हमी योजना विभागात सहायक लेखाधिकारी आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना रितसर पत्र लिहून कार्यालयात घोड्यावर येऊ देण्याची आणि कार्यालय परिसरात घोडा बांधू देण्याची परवानगी मागितली आहे. पण देशमुख यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे कार्यालयात घोड्यावर येण्याचा निर्णय घेतला का? तर या प्रश्नाचे उत्तर मात्र नाही, असेच आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख म्हणतात की, मी सहायक लेखाधिकारी ( रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे कार्यालयात टु व्हीलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. घोड्यावर बसून विहीत वेळेत कार्यालयात येणे मला शक्य होईल. व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालय परिसरात  परवानगी देण्यात यावी.

देशमुख यांनी बुधवारीच जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र दिले आहे. सध्या त्यांचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. आता नांदेडचे जिल्हाधिकारी त्यांना कार्यालयात घोड्यावर येण्याची आणि कार्यालय परिसरात घोडा बांधण्याची परवानगी देणार का? हा खरा प्रश्न आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा