पीएफचे व्याजदर घटवलेः ८.५ टक्क्यांऐवजी आता मिळणार ८.१% व्याज, चार दशकातील सर्वात कमी

0
112
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. आतापर्यंत पीएफवर ८.५ टक्के व्याजदर मिळत होता. त्यात कपात करून तो आता ८.१ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. १९७७-७८ नंतर पीएफवर मिळणारा हा सर्वात कमी व्याजदर आहे. १९७७-७८ मध्ये पीएफवर ८ टक्के व्याजदर मिळत होता.

भारतात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघठन म्हणजेच ईपीएफओचे ५ कोटी सदस्य आहेत. त्यामुळे पीएफवरील व्याजदर कपातीचा मोठा फटका या कर्मचाऱ्यांना बसणार आहे. ईपीएफओच्या विश्वस्तांच्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत पीएफवरील व्याजदर कपातीचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रीय मंडळाची शिफारस लवकर केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवली जाणार आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यापूर्वी २०२० मध्ये पीएफवरील व्याजदरात कपात करण्यात आली होती. त्यावेळी पीएफवरील व्याजदर ८.६५ टक्क्यांवर होता. त्यात कपात करून तो ८.५ टक्के करण्यात आला होता.

ज्यांच्या पगारातून पीएफच्या रकमेची कपात केली जाते, अशा कर्मचाऱ्यांचे पीएफवरील व्याजदर कपातीमुळे थेट नुकसान होणार आहे. सरकारी नोकऱ्यांबरोबरच खासगी कंपन्यांमध्येही काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफची सुविधा दिली जाते.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

ईपीएफओच्या व्याजदर कपातीच्या या निर्णयाला कर्मचारी संघटना आणि राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांसाठी पीएफ म्हणजे संकटकाळी कामी येणारा पैसा असतो. त्यावर मिळणाऱ्या व्याजदरामुळे त्यांना आर्थिक मदत मिळते. परंतु केंद्र सरकार सातत्याने पीएफवरील व्याजदरात कपात करत चालले आहे. त्याचा थेट आर्थिक फटका देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना बसत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा