औरंगाबाद-नवी मुंबईसह महानगरपालिका, नगरपालिकेवरील १२ प्रशासकांना मुदतवाढ

0
147
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  राज्यातील मुदत संपलेल्या आणि  कोरोनाच्या संकटामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या १२  महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींवरील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा आदेश लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे.

औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई- विरार महापालिकेसह इतर आठ नगरपालिका आणि एका नगरपंचायतींची मुदत मे आणि जून २०२० मध्येच संपली. या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना कोरोनाचे संकट आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार या संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले होते.  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती  आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये प्रशासकाचा कालावधी सहा महिन्यापेक्षा जास्त करण्यासंदर्भात सुधारणा करणे गरजेचे होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधीचे आदेश लवकरच जारी केले जाणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा