मराठी गझलेचे ‘तळहात उसवले’, प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन

0
146
छायाचित्रः फेसबुक

सांगलीः ‘नाव गाव माझे बदलून पाहिले मी… अन् मुखवटे हजारो चढवून पाहिले मी… मी काय काय केले, सांगू किती कुणाला… तळहात आज दोन्ही उसवून पाहिले मी… अशा शब्दांत ’मानवी जीवनातील दुःख आणि वेदना शब्दबद्ध करणारे आणि मराठी गझलविश्वाला उतूंग शिखरावर नेऊन पोहोचवणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे आज निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.

नवोदित गझलकारांसाठी इलाही जमादार गझल  क्लिनिक नावाने गझल कार्यशाळाही घ्यायचे. मराठी गझल समृद्ध करण्यात सुरेश भटांनंतर इलाही जमादार यांचेच नाव घेतले जाते. इलाहींच्या अनेक गझला अजरामर झाल्या आहेत. इलाही यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे झाला होता. त्यांनी १९६४ पासून काव्यलेखनास सुरूवात केली होती. आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले.

मी कळी मला फुलायचे, जखमा अशा सुगंधी, भावनांची वादळे, दोहे इलाहीचे, मुक्तक अशी इलाही यांची काव्य व गझल संग्रह प्रसिद्ध आहेत. मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दूमध्येही त्यांनी काव्य आणि गझल लेखन केले आहे. ‘आत्म्याचा सौदा करून जर स्वतःस विकले असते, एकेक वीट सोन्याची घर असे बांधले असते,’ अशा त्यांच्या कित्येक गझला अजरामर आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा