भारत बंद सुरु, देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

0
65
औरंगाबादेतील आंदोलनाचे दृश्य.

नवी दिल्लीः  मोदी सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेले भारत बंद आंदोलन सुरु झाले आहे. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, दिल्ली या राज्यात हा बंद मोठ्या प्रमाणावर पाळण्यात येत आहे.

 पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा देण्यासाठी सीटू संघटनेने मोर्चा काढला. कर्नाटकमध्ये काँग्रेस नेत्यांनी बेंगळुरूतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. ओडिशामध्ये भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी रेल्वे रोखून धरल्या आहेत. आंध्र प्रदेशात डावे पक्ष आणि एसएफआयने विशाखापट्टणम येते आंदोलन केले.बिहारमध्येही राजदच्या कार्यकर्त्यांनी दरभंगा येथे टायर जाळून मोदी सरकारचा निषेध केला.

महाराष्ट्रात सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या ग्रामीण भागातही या बंदचा परिणाम जाणवत आहे. या बंदच्या समर्थनार्थ पुण्यात ठिय्या आंदोलन केले जात आहे. राज्यात काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई या ठिकाणीही आंंदोलने होत आहेत.

अरविंद केजरीवाल नजरकैदेतः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा आपने केला आहे. काल सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भेटून घरी आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानुसार घरातच नजरकैद करण्यात आले आहे. भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी ते घराबाहेर पडू नयेत म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे, असा दावा आपचे संजय सिंग यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा