शेतकरीविरोधी विधेयकेः देशभरातील शेतकरी मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर!

0
53

नवी दिल्लीः सन २०२२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारने केलेल्या तीन शेतकरी विरोधी विधेयकांमुळे देशभरातील शेतकरी संतप्त झाले असून आज महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शेतकरी संसदेबाहेर आंदोलन करणार आहेत.

 भारतीय किसान युनियनशी संबंधित शेतकरी आज संसदेबाहेर आंदोलन करून मोदी सरकारने आणलेल्या तीन विधेयकांचा विरोध करणार असून या आंदोलनात महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी सहभागी होणार आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम सिंह यांनी न्यूज १८ हिंदीला ही माहिती दिली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित तीन विधेयके आणली आहेत. ही तिन्ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याचा शेतकरी संघटनांचा आरोप आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचे काही घटक पक्षही या विधेयकाच्या विरोधात आहेत. शिरोमणी अकाली दलाने या विधेयकांच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकारने या अधिवेशनात  शेतकरी व्यापार व वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक २०२०, कृषी (सबलीकरण आणि संरक्षण) हमी भाव करार आणि कृषीसेवा विधेयक २०२० ती तीन विधेयके आणली आहेत. ही तिन्ही विधेयके शेतकरी हिताच्या विरोधात असल्याचा शेतकरी संघटनांचा आरोप आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा