मुख्यमंत्र्यांवर अर्वाच्च भाषेत टीकाः भाजप नेते नारायण राणेविरुद्ध बार्शीत गुन्हा दाखल

0
489
संग्रहित छायाचित्र.

सोलापूरः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अर्वाच्च भाषा वापरल्या प्रकरणी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्याविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून राणेंच्या विरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास त्यांच्या पुतळ्याचे दहन करू, असा इशारा आंधळकर यांनी बार्शी पोलिसांना दिला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे पुळचट मुख्यमंत्री आहेत. थापेबाज मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे, अशी टीका केली होती.

 उद्धव ठाकरे स्वतःला वाघ म्हणवतात त्यांनी कधी कुणाला एक कानफटात तरी मारली आहे का? गुन्हे आम्ही अंगावर घेतले या शेळपट माणसाने नाही. वाघ कसला? हा तर शेळपट माणूस.. हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे शेलके शब्दही राणेंनी वापरले होते. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा