नवबौद्धांविषयी आक्षेपार्ह पोस्टः अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

0
642
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ‘सहा डिसेंबरला नवबौद्ध फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क’ अशी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकणारी अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात रबाळे पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केतकी चितळे हिने १ मार्च रोजी तिच्या अधिकृत फेसबुक पेजवर भली मोठी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यात तिने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा सर्वच धर्मांचे दाखले देत टीका केली आहे. ‘तुम्ही बुरख्यात राहिलात, मुसलमान आहोत हे दाखवून देणारी टोपी घातली तर ते धर्म स्वातंत्र्य आहे,’ असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वााचाः सहा डिसेंबरला नवबौद्ध फुकट मुंबई दर्शनास येतातः अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट

 ‘नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू असा शब्द उद्गारला तर घोर पापी, कट्टरवादी! पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत. आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,’ असे केतकी चितळेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 केतकी चितळेने नवबौद्धासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत स्वप्नील जगताप यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.त्या तक्रारीवरून रबाळे पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा