किमान शैक्षणिक कामकाजाच्या अटींमुळे शिक्षक- प्राध्यापक ‘पाच दिवसांच्या आठवड्या’ला मुकले!

0
269
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत घेतला, मात्र किमान शैक्षणिक कामकाजाच्या अटींमुळे राज्यातील शिक्षक- प्राध्यापक पाच दिवसाच्या आठवड्याला मुकल्याचे शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

शाळा आणि आयटीआयमध्ये जेवणाची सुटी धरून दर आठवड्याला किमान ४५ तास कामकाज व्हावे अशी अट आहे. त्यात आयटीआयसाठी २८ तास प्रात्यक्षिके, १० तास तासिका आणि चार तास अतिरिक्त शिक्षणाची अट आहे. तर दुसरीकडे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांसाठी तासिकांचे प्रमाण वेगवेगळे आहे. राज्यातील विद्यापीठांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यास वर्षातील एकूण सुटीचे दिवस २३५ च्या वर जाणार आहेत. तसे झाल्यास किमान शैक्षणिक कामकाजाची यूजीसीची अट पाळणे अशक्य होणार असल्याचे पाच दिवसांच्या आठवड्यातून विद्यापीठे, शाळांना वगळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयातून जे विभाग आणि संस्थांना वगळण्यात आले आहेत, त्यांच्याकडूनही पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी होत असली तरी आता विभागवार खुलासे देऊन त्यांच्या शंकांचे निरस्सण करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा