बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत पोलिसांचे पथसंचलन

0
28

औरंगाबादः उद्या देशभरात बकरी ईद म्हणजेच ईद- अल-अधाह साजरी करण्यात येणार असून त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी आज शहरातील मुस्लिमबहुल भागांत पथसंचलन केले.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. बकरी ईदच्या दिवशी कुर्बानीवर कोणतेही निर्बंध नसले तरी कोरोनामुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी आणि बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये, असे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी औरंगाबाद पोलिसांनी मुस्लिमबहुल भागात पथसंचलन केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही आणि संसर्ग फैलावणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी म्हणून हे पथसंचलन करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा