ऐतिहासिक ‘बिबी का मकबरा’ परिसरात विकसित करणार शोभिवंत फुलांची आकर्षक बाग!

0
132
जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांच्या हस्ते नगर भूमापन अधिकारी शालिनी बिदरकर यांचा सत्कार करण्यात आला.

औरंगाबाद: दख्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा बिबी का मकबरा परिसरात सुशोभित फुलांची बाग विकसित करून हा परिसर अधिक आकर्षक करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे (एएसआय) अधीक्षक पुरातत्वविद डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली.

जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील पुरातत्व विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नगर भूमापन अधिकारी शालिनी बिदरकर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी पुरात्त्व विभागाचे प्रशासनिक अधिकारी विलीश रामटेके, सर्व्हेअर अशोक तुरे, ज्येष्ठ पत्रकार विलास इंगळे यांची उपस्थिती होती. यावेळी शालिनी बिदरकर व नगर भूमापन विभागातील सर्व्हेअर हेमंत औटी यांचा पुरातत्व विभागाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व ऐतिहासिक अजिंठा लेणीचे शिल्पचित्र देऊन सत्कार करण्यात आला.

नगर भूमापन विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे बिबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूचे मालकी हक्क (पीआर कार्ड) पुरातत्व विभागाकडे आले आहे. लवकरच मकबरा परिसरातील जमिनीची मोजणी करून तो भाग विकसित करण्यात येणार आहे. या कामी नगर भूमापन अधिकारी कार्यालयाने तातडीन योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन डॉ. चावले यांनी यावेळी केले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

बिबी का मकबरा या वास्तूचे पीआर कार्ड आपल्या हातून झाले, हे मी माझे भाग्य समजते. खरे तर याचे श्रेय आम्हाला देण्याचे काही कारण नाही. हा आमच्या कामाचा भाग आहे. भविष्यातही पुरातत्व विभागाची आमच्या खात्याशी संबंधित कामे तातडीने निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन यावेळी नगर भूमापन अधिकारी शालिनी बिदरकर यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलीश रामटेके यांनी केले. कार्यक्रमास पुरातत्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा