पत्नीचा वाढदिवस विसरणाऱ्या पतीला थेट तुरूंगाची हवा, कायद्यातच केली तरतूद!

0
499
प्रातिनिधिक छायाचित्र.

सामाओः प्रत्येक देश आपापल्या गरजेनुसार कायदे करत असतो. त्या देशाची सामाजिक-सांस्कृतिक धाटणी जशी असेल त्याप्रमाणे कायदे केले जातात आणि त्याची अंमलबजावणीही केली जाते. परंतु पत्नीचा वाढदिवस विसरणाऱ्या पतीला थेट तुरूंगवासाची शिक्षा देणारा कायदाच एखाद्या देशाने केला तर? जगाच्या पाठीवर असा एक देश आहे की, तेथे पतीन आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि पत्नीचा वाढदिवस विसरणाऱ्या पतीला थेट तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते.

पॅसिफिक महासागरात सामाओ नावाचा एक छोटासा सुंदर देश आहे. बेटावर वसलेल्या या देशात एखाद्या नवऱ्याने आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूदच तेथील कायद्यात करण्यात आलेली आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

पत्नीचा वाढदिवस विसरणे आणि त्या दिवशी तिला शुभेच्छा न देणे हा सामाओ देशातील कायद्यानुसार गुन्हा आहे. पत्नीचा वाढदिवस विसरणाऱ्या पतीने हा गुन्हा केला असेल तर त्याला सोडून दिले जात नाही. त्याची चौकशी केली जाते आणि पत्नीचा वाढदिवस विसरल्याच्या गुन्ह्यात त्याला थेट तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येते.

पतीला अशी शिक्षा होण्यासाठी मात्र या कायद्यात एक अट आहे. आपल्या पतीने आपला वाढदिवस विसरल्याची अधिकृत तक्रार पत्नीने केली पाहिजे आणि त्याने वाढदिवस विसरल्याचा स्पष्ट उल्लेखही त्या तक्रारीत असणे आवश्यक आहे. पत्नीच्या तक्रारीतील हा स्पष्ट उल्लेखच पतीला तुरूंगाची हवा खावू घालण्यासाठी येथील कायद्यानार ठोस पुरावा आहे.

पतीने पत्नीचा वाढदिवस विसरल्याची चूक त्याच्या कायमस्वरुपी लक्षात रहावी आणि ती चूक सुधारण्याची त्याला संधी मिळावी म्हणून सामाओमध्ये असा कायदा करण्यात आल्याचे सांगितले जाते. पत्नीच्या वाढदिवसासाठी अशी खास तरतूद असणारा सामाओ हा जगाच्या पाठीवरील पहिलावहिलाच देश ठरला आहे.

रविवारी सकाळी पत्नीवर ओरडणे गुन्हाः असाच एक कायदा मिशिगनमध्येही आहे. रविवारी सकाळी पतीने पत्नीवर मोठ्या आवाजात ओरडणे हा मिशिगनच्या डेट्रॉइटमध्ये गुन्हा ठरवणारा कायदा आहे. मिशिगनमध्ये रविवार हा पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळे रविवारी पत्नीवर आवाज चढवणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे.

अनेक कायदेः जगाच्या पाठीवरील अनेक देशात अनेक कायदे आहेत. उत्तर कोरियामध्ये निळ्या रंगाची जिन्स घालून घराबाहेर पडणे गुन्हा आहे. पूर्व आफ्रिकेत जॉगिंग करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तर ओक्लाहोमामध्ये कुत्र्याकडे पाहून वेडेवाकडे तोंड केले तर तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा