कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची होणार साक्षीदार म्हणून चौकशी?

0
273
संग्रहित छायाचित्र .

मुंबईः माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी  संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप केले मात्र त्यांच्यावर कारवाईसाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी करण्यात यावी आणि यासाठी त्यांना साक्षीदार म्हणून समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी चौकशी आयोगाकडे केली आहे.

 डॉ.संजय लाखे पाटील यांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव- भीमा दंगल प्रकरणाची चौकशी करणा ऱ्या आयोगाकडे यासंदर्भात याचिकाच दाखल केली आहे. 1 जानेवारी 2018 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप केले होते. परंतु त्यांच्याविरोधात कारवाईसाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याची उलटतपासणी होणे आवश्यक आहे. फडणवीसांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने कोरेगाव- भीमा प्रकरणात अर्बन नक्षलवादाचा मुद्दा आणला पण खर्‍या आरोपींची चौकशीच केली नाही, असे डॉ. संजय लाखे पाटील यांनी म्हटले आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणाशी संबंधित सर्व कॉल रेकॉर्ड, पोलिस नियंत्रण कक्षाचे कॉल रेकॉर्ड, वायरलेस कॉल रेकॉर्डसची चौकशी आयोगाने तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोरेगाव- भीमा प्रकरणाशी संबंधित हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न स्थानिक पोलिसांकडून होत असल्याचाही लाखे पाटलांचा आरोप आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा