गडकिल्ले ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रतिके, त्यावर छमछम खपवून घेणार नाही : शरद पवार

0
98

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. या स्वाभिमानाच्या प्रतिकांवर छमछम कदापि सहन केली जाणार नाही, असा इशारा देत इतिहास पुसणारे नव्या पिढीसमोर काय इतिहास ठेवणार, असा सवाल राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

औरंगाबादेत आयोजित कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात पवारांनी शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारीच्या मुद्यांवर राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. पवार म्हणाले, पिकाला हमीभाव आणि सततच्या दुष्काळाने  शेतकरी हैरान आहे. यामुळे अजतागायत 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.  मात्र अजूनपर्यंत शेतकर्‍यांचे  कर्ज माफ झालेले नाही. शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव, मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.

पाकिस्तानात ज्यांच्या हाती सत्ता आणि सैन्य आहे. तेच सत्ता टिकवण्यासाठी भारताला वारंवार टारर्गेट करतात. असे दोन प्रकारचे लोक भारताविरोधात बोलतात, असे एका कार्यक्रमात बोलताना म्हणालो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्रीलायक माहिती घेऊन टिका करावी, असे बरे नव्हे मोदी. मी चौदा वेळा निवडून आलो, चार वेळा मुख्यंमत्री झालो, दोन वेळा कृषी मंत्री, एक वेळा संरक्षण मंत्री होतो. एवढी पदे उपभोगल्यानंतर मी पाकिस्तानची बाजू कशी घेईन? त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्रीलायक माहिती घेऊन टीका करावी. पंतप्रधानांविषयी बोलण्यासारखे माज्याकडे खूप काही आहे, परंतु मी पंतप्रधानांसारख्या संवैधानिक पदाचा अपमान करणार नाही,असे पवार म्हणाले. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि पूर्वीचे नाना फडणवीस एकच दिसतात. यामुळे, मुख्यंमत्र्यावर मी काही बोलणार नाही.

21 व्या शतकातकाले छत्रपती अनाजी पंताना शरण गेले-मुंडे

16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय इतिहास घडवला आहे. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवणे गरजेचे आहे. इतिहासातील छत्रपतींच्या घरात आनाजी पंतानी चुगल्या केल्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आनाजी पंतानी तडीपार केले होते. मात्र 21 व्या शतकातील छत्रपती आनाजी पंताना शरण गेले आहेत.नाशिकमध्ये महाजनादेश यांत्रेचा समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार होत होता. त्यावेळी 21 व्या शतकातील छत्रपतींना बाजूला सारून त्यांचा अपमान करण्यात आला, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा