ऊसाला मिळणार प्रतिक्विंटल २९० रुपये एफआरपी!

0
110
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने ऊसाच्या किमान हमीभावात म्हणजेच एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ऊसाला प्रतिक्विंटल २९० रुपये एफआरपी मिळणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली.

 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या आज झालेल्या बैठकीत १० टक्के साखरेच्या रिकव्हरीच्या (उत्पादक क्षमता) आधारावर ऊसावरील एफआरपी २९० रुपये प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या शेतकऱ्याची रिकव्हरी ९.५ टक्क्यांपेक्षा कमी असले तर त्याला २७५.५० रुपये प्रतिक्विंटल एफआरपी मिळेल, असेही गोयल म्हणाले.

 याआधी ऊसाचा एफआरपी २८५ रुपये प्रतिक्विंटल होता. यंदा त्यात प्रतिक्विंटल ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढवावी, असेही गोयल म्हणाले. देशातील उत्पादक क्षमता वाढत आहे. ऊसापासून साखरेचे उत्पादन घेण्याची प्रमाणही वाढत आहे. गेल्यावर्षी साखरेची विक्रमी म्हणजेच ७० लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली, असेही गोयल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा