सामूहिक बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडितेला पतीसह विवस्त्र करून अमानुष मारहाण

0
603
प्रतिकात्मक छायाचित्र.

अहमदनगरः सामूहिक बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासी पीडित महिलेसह तिच्या पतीलाही बांधून विवस्त्र करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरात घडली. पीडित महिला आणि तिच्या पतीच्या अंगावर पेट्रोलही टाकण्यात आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली असून हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

२०१६ मध्ये अहमदनगरमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या सामूहिक बलात्काराच्या आरोपींमध्ये वडील आणि भावासह एका पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. बलात्काराच्या घटनेचा जिल्हा रूग्णालयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून आरोपी पीडित महिला आणि तिच्या पतीवर फिर्याद मागे घे म्हणून वारंवार दबाव टाकत होते.

 २४ जानेवारी २०२० रोजी पीडित महिला आणि तिचा पती शासकीय रूग्णालयातून उपचार घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. या दोघांना एका खोलीत बंदिस्त करून त्यांचे कपडे काढण्यात आले. त्यांच्याच कपड्यांनी त्यांना बांधण्यात आले आणि पट्ट्याने मारहाण करून अंगावर पेट्रोल ओतण्यात आले. फिर्याद मागे घ्या, अन्यथा मारून टाकू अशी धमकीही देण्यात आली, असा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे. फिर्याद मागे घेतली नाही तर तू दुसऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची गुन्हा दाखल करू, अशी धमकीही देण्यात आल्याचे पीडितांनी सांगितले. आम्ही तुमच्या विरुद्ध फिर्याद देणार नाही, अशी हमी पीडित पती-पत्नीने दिल्यानंतर या दोघांनाही अहमदनगरला आणून सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा