६३ व्या ग्रॅमी अवॉर्डच्या जागतिक मंचावर पोहोचले शेतकरी आंदोलनः लिलीच्या मास्कने वेधले लक्ष

0
134
छायाचित्र सौजन्यः twitter/@Lilly

लॉस एंजिलिसः भारतीय- कॅनडीयन वंशाची कॉमेडियन यूट्यूबर लिली सिंगने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ६३ व्या ग्रॅमी अवॉर्ड्सच्या जागतिक मंचाचा वापर केला. लिली सिंग ग्रॅमीच्या रेड कार्पेटवर ‘आय स्टॅण्ड विथ फार्मर्स’ म्हणजेच मी शेतकऱ्यांच्या पाठीशी असा लिहिलेला काळा मास्क घालूनच आली.

ग्रॅमीच्या रेड कार्पेटवर ‘I Stand With Farmers’  असे लिहिलेला काळ्या रंगाचा मास्क घालून आल्यानंतर लिली सिंगने तिच्या ट्विटवर पेजवर हा फोटो शेअर केला आहे आणि रेड कार्पेट/ अवॉर्ड शोच्या छायाचित्रांना नेहमीच खूप प्रसिद्धी मिळते, हे मला माहीत आहे. तुम्ही इथे जा मीडिया. #IStandWithFarmers #GAMMYs  या हॅशटॅगसह हे दाखवायला संकोचू नका, असे ट्विट तिने या छायाचित्रासोबत केले आहे.

ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात जगभरातील संगीत क्षेत्रातील नामवंत हस्ती सहभागी होत असतात आणि जगभरातील लक्षावधी लोक हा सोहळा पहात असतात. लिली सिंग शेतकरी आंदोलनाची सुरूवातीपासूनच खंदी समर्थक राहिली आहे. तिचे आईवडिल भारतीय वंशाचे आहेत. लिलीचे इन्स्टाग्रामवर ९ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत तर तिच्या यूट्यूट चॅनेलचे १ कोटी ४० लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. डिसेंबरमध्ये लिलीने  एका व्हायरल टिकटॉक व्हिडीओ क्लिपमध्ये तिच्या जगभरातील चाहत्यांना थांबा आणि भारतात सुरू असलेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या मानवी आंदोलनाची माहिती घ्या, असे आवाहन केले होते.

मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी १०० दिवसांहून अधिक काळापासून आंदोलन करत आहेत. चर्चेच्या १० फेऱ्या होऊनही तोडगा निघालेला नाही. या तीन कृषी कायद्यांमुळे शेती आणि शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या कब्जात जातील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा