५ टक्के जीडीपीवर हसू नका, याच मंदीत भाजपला ७ कोटी नवीन सदस्य मिळाले आहेत…!

0
154


मोदी सरकारची आर्थिक धोरणे चांगली किंवा वाईट असू शकतात, त्यावर चर्चाही होऊ शकते. परंतु त्याचे परिणाम बोगस आहेत, हेच गेल्या साडेपाच वर्षांत दिसून आले. सरकारने स्वतःच रूजवलेले सर्व नारे सोडून दिले. स्कील इंडियाची स्थिती ही आहे की, आता तिचे रुपांतर स्पर्धेत करण्यात येत आहे. तेही अपयशी ठरले. मेक इन इंडियाच्या स्थितीवर तर कुणी चर्चाही करत नाही. आम्ही निर्यातीऐवजी आयात करणारा देश बनलो आहोत. मॅन्युफॅक्चरिंग 0.6 टक्क्यांवर येऊन ठेपले आहे.

  • रविश कुमार
  • रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार
  • अजिबात हसू येत नाहीए. बरेच लोक हसत आहेत. सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच जीडीपीचा दर 5 टक्क्यांवर आला आहे. हे हसणेच मला क्रूर बनायला भाग पाडू नये म्हणून मी सतर्क आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. लाखो लोकांना नोकऱ्या मिळेनाशा झाल्या आहेत. नरेंद्र मोदींचे सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरले आहे, म्हणून मी हसू शकत नाही. त्याचा परिणाम माझ्यावरही पडेल, माझ्या सहकाऱ्यांवर आणि ज्यांना मी ओळखत नाही परंतु त्यांच्या यातनांशी रोज मी जोडला गेलेला असतो. कोणाच्या तरी घरात अंधार असेल. तुमचे हसणे तुमच्या मनात अंधार निर्माण करून जाईल.

2014 नंतर स्वतः अर्थव्यवस्था समजून घेण्याच्या दिशेने पावले टाकली. काही पर्याय नव्हता म्हणून बिझनेस वृत्तपत्रे आणि बिझनेसशी संबंधित लोकांशी चर्चा करून समजून घेऊ लागलो. लोकांना ही धोरणे नीटपणे कळायला हवी आणि मला स्वतःलाही कळायला हवी म्हणून फेसबुक आणि कस्बावर असंख्य लेख लिहिले. मोदी सरकारची आर्थिक धोरणे चांगली किंवा वाईट असू शकतात, त्यावर चर्चाही होऊ शकते. परंतु त्याचे परिणाम बोगस आहेत, हेच गेल्या साडेपाच वर्षांत दिसून आले. सरकारने स्वतःच रूजवलेले सर्व नारे सोडून दिले. स्कील इंडियाची स्थिती ही आहे की, आता तिचे रुपांतर स्पर्धेत करण्यात येत आहे. तेही अपयशी ठरले. मेक इन इंडियाच्या स्थितीवर तर कुणी चर्चाही करत नाही. आम्ही निर्यातीऐवजी आयात करणारा देश बनलो आहोत. मॅन्युफॅक्चरिंग 0.6 टक्क्यांवर येऊन ठेपले आहे.

नोटबंदीचा निर्णय राष्ट्रीय गुन्हा होता, असे मी आजही मानतो. लोकांनी तो हसण्यावर नेला. पंतप्रधान मोदींचा प्रभाव आणि त्यांच्या विचारसरणीने भारलेला व्यापारी वर्ग आणि त्यंच्या भयाने आक्रांत उद्योगजगताने ही वस्तुस्थिती पचवून घेतली.  विरोधी पक्षात नैतिक बळ नाही. ते आपल्या अनैतिकतेच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची प्रत्येक अनैतिकता कोणत्याही प्रतिसादाशिवायच स्वीकारली जाऊ लागली आहे. नोटबंदी यशस्वी करण्यासाठी जो युक्तिवाद केला जात होता, तोच आता काश्मीरच्या बाबतीतही केला जात आहे. जणू काही तेथे 50 महाविद्यालये आणि दुकाने सुरू करण्यासाठी एका संपूर्ण राज्याला केंद्रशासित प्रदेश करून टाकले आहे. एक कोटी लोकांना माहितीशून्य अवस्थेत टाकण्यात आले आहे. नोटबंदीचे परिणाम कुठेच दिसत नाही. दूरगामी परिणामांचे स्वप्न दाखवण्यात आले होते. तीन वर्षांनंतर नोटबंदीचे दूरगामी परिणाम भयावह दिसू लागले आहेत. नोटबंदीच्या दुसऱ्याच वर्षी उद्योग जगतातील गुंतवणुकीत 60 टक्के घट झाली होती.

नोटबंदीनंतरच मंदी येऊ लागली होती. एखाद्या खगोलीय घटनेप्रमाणे आर्थिक आघाडीवर नवनवीन इव्हेंट सुरू करण्यात येऊ लागले. जीएसटीला दुसरे स्वातंत्र्य मिळाल्याप्रमाणे साजरे केले गेले. तिच्या परिणामातून अर्थव्यवस्था आजपर्यंत सावरू शकलेली नाही. ‘एक राष्ट्र, एक कर’चा नारा देण्यात आला. जीएसटीने सूरत होत्याचे नव्हते करून टाकले. तेथील व्यापार अर्ध्यापेक्षाही कमी झाला. तरीही तेथील व्यापाऱ्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात  साधा एक नाराही दिला नाही, हे एखाद्या समाजशास्त्रज्ञाने समजून घेतले पाहिजे. ते मोदींप्रति मन आणि धनाने समर्पित राहिले आणि पुढेही राहातील. आज कापड उद्योग होत्याचा नव्हता झाला आहे. त्याची अवस्था जर्जर झाली आहे. असे असूनही कुणी आवाज काढत नाही. विरोध होत नाही. पाच वर्षे आर्थिक आघाडीवर अपयशी ठरूनही त्याच क्षेत्राच्या ह्रदयांवर एकछत्री राज्य करतो आहे, असा कुणी नेता आहे का?. कोणीही नाही.


45 वर्षांतील सर्वात अधिक बेरोजगारी ! बेरोजगारांनीच मोदींना आपला मसीहा मानले आणि डोक्यावर घेतले, ही नरेंद्र मोदींची लोकप्रियता होती. सन 2013 मध्ये नरेंद्र मोदी लोकसंख्येच्या लाभांशाची गोष्ट करत होते. आमच्याकडे सर्वात जास्त युवा आहेत. ही आमची ताकद आहे, असे ते सांगत होते. 2019 मध्ये ते आता हीच लोकसंख्या समस्या असल्याचे सांगू लागले आहेत. लोक आता सर्व कारणे लोकसंख्येत शोधू लागले आहेत. आपण शोधून काढलेल्या या कारणांवर लोक संतुष्टही आहेत.

त्यामुळे आर्थिक संकटाच्या प्रत्येक बातमीत मोदी विरोधाची अपेक्षा बाळगणाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. मोदींवर हसण्याची गरज नाही. आर्थिक आघाडीवर ते काही आज पहिल्यांदा अपयशी ठरलेले नाहीत. त्यांच्याकडे कोणताही नवीन कल्पना नाही. किंबहुना विरोधी पक्षाकडेही एखादी नवीन आर्थिक कल्पना नाही. तुम्ही पहा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अवस्था किती बिकट होऊन बसली आहे. नवीन रस्ते निर्मितीला नकार दिला जात आहे आणि बकवास योजनांमुळे कर्ज वाढल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. ब्लूमबर्ग आणि लाइव्ह मिंटने लिहिले आहे की, स्वतः पंतप्रधान कार्यालयानेच ही बाब प्राधिकरणाला सांगितली आहे. हा साक्षात्कार अचानक झाला का? तुम्ही थोडे आठवून पाहा. चॅनल्समध्ये कशा रितीने रस्ते निर्मितीचे आकडे सांगितले जात होते. अनेक महामार्ग तर असे आहेत की त्यांची फक्त भूमिपूजने होत गेली, पण अपूर्णवावस्थेत पडलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. बँकांच्या आतमध्ये आर्थिक धोरणाचे रहस्य गाडून टाकले आहे. ही आर्थिक धोरणे काश्मीर आणि हिंदू- मुस्लिमांच्या ‘राष्ट्रीय अभ्यासक्रमा’ने गिळंकृत करून टाकले आहे. बँकर आपल्या डोळ्यांनी वस्तुस्थिती पहात होतो, पण डोक्यात काही औरच नशा सवार झालेली होती. परिणामी ना पगार वाढला, ना नोकरीची शाश्वती राहिली. कामाची अवस्था बिकट होत गेली. आजच्या बँकर्सना प्रत्येक मोजपट्टीवर गुलाम म्हटले जाऊ शकते, असे मी कितीतरी लेखात म्हटले आहे. महालॉगिन डे दुसरे तिसरे काहीही नसून दास आणि गुलामांप्रमाणे बँकर्सच्या आत्म्याचा लिलाव आहे. उलट नोटबंदीच्या वेळी हे बँकर समज होते की, ते देशासाठी काही तरी करत आहेत. नोटा मोजताना झालेल्या चुकांचा भूर्दंड आपल्या खिशातून भरत होते. बँकर्सना कर्ज घेऊन अशा बँकेचे शेअर्स खरेदी करायला भाग पाडण्यात आले ,ज्या बँकेची वस्तुस्थिती ते  आतमध्ये काम करताना ते उघड्या डोळ्यांनी पहात होते. आज त्यांचे शेअर बुडाले आहेत. ही पूर्णतः आर्थिक गुलामी आहे. ‘राष्ट्रीय अभ्यासक्रमा’ने त्यांची छाती फुगवली आहे. ते राजकीयदृष्ट्या पहिल्यापेक्षा किती तरी स्वतंत्र आणि बोलायचा मोकळे आहेत. आपल्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअपमध्ये दररोज ‘राष्ट्रीय अभ्यासक्रमा’चे टॉनिक पिऊन मदहोश आहेत.

45 वर्षांतील सर्वात अधिक बेरोजगारी ! बेरोजगारांनीच मोदींना आपला मसीहा मानले आणि डोक्यावर घेतले, ही नरेंद्र मोदींची लोकप्रियता होती. सन 2013 मध्ये नरेंद्र मोदी लोकसंख्येच्या लाभांशाची गोष्ट करत होते. आमच्याकडे सर्वात जास्त युवा आहेत. ही आमची ताकद आहे, असे ते सांगत होते. 2019 मध्ये ते आता हीच लोकसंख्या समस्या असल्याचे सांगू लागले आहेत. तुम्ही गुगल सर्च करून नरेंद्र मोदींची 2013 मधील वक्तव्ये काढू शकता. लोक आता सर्व कारणे लोकसंख्येत शोधू लागले आहेत. आपण शोधून काढलेल्या या कारणांवर लोक संतुष्टही आहेत. पाच वर्षांत एकाही विद्यापीठाची अवस्था सुधारलेली नाही, तरीही तरूणाई मोदी मोदी करत राहिली. ज्याने शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात शून्य प्रदर्शन करुनही युवांचा आवडता नेता बनला, असा नेता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.


नोटबंदीचा निर्णय राष्ट्रीय गुन्हा होता, असे मी आजही मानतो. लोकांनी तो हसण्यावर नेला. पंतप्रधान मोदींचा प्रभाव आणि त्यांच्या विचारसरणीने भारलेला व्यापारी वर्ग आणि त्यंच्या भयाने आक्रांत उद्योगजगताने ही वस्तुस्थिती पचवून घेतली.  विरोधी पक्षात नैतिक बळ नाही. ते आपल्या अनैतिकतेच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाची प्रत्येक अनैतिकता कोणत्याही प्रतिसादाशिवायच स्वीकारली जाऊ लागली आहे.

अर्थव्यवस्थेत चढउतार येत असतात. आज वाईट असेल, तर उद्या चांगलीही होत असते. परंतु 2014 ते 2019 दरम्यान खोल रूतत गेली. सरकार आणि व्यापार जगत या सगळ्यांना हे माहीत होते. त्यामुळे 2019 मध्ये नवीन स्वप्न लाँच करण्यात आले. 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न! दर सहा महिन्यांना भारताला आता नवीन स्वप्न हवे आहे. नरेंद्र मोदी नवीन स्वप्न घेऊन येतात. भारताची अर्थव्यवस्था संकटातून जात आहे, हे न्यूजचॅनल्सना दिसत होते, परंतु त्यांना काश्मीरचा बहाना मिळाला. ज्याप्रमाणे उर्वरित भारतातील लोक काश्मीरातील लोकांचा आवाज बंद करण्याला योग्य ठरवत होते, त्याचप्रमाणे ते स्वतःच काश्मीर बनले आहेत. त्यांचा आवाज आणि खरे चित्र चॅनल्सवर दिसत नाही. त्यांचा आवाज ऐकला जात नाही. आपण जे दुसऱ्यांसाठी मान्य करतो, ते आपल्या स्वतःसाठीही मान्य होऊन बसते. अर्थव्यवस्था रूतली आहे, ही वस्तुस्थिती मीडियाने आरामात दाबून टाकली. मीडियामध्येही कर्मचारी कपात होऊ लागली आहे.

कोणतीही नवीन आयडिया नाही, हीच गोष्ट सुब्रमण्यम स्वामीही सांगत आहे. भाजपचे खासदार आहेत. 5 ट्रिलियनची गोष्ट विसरून जा, असे ट्विट करू लागले आहेत. ना ज्ञान आहे, ना धैर्य. पण म्हणून काय या वस्तुस्थितीमुळे भाजपचे समर्थक घटू शकतात? अजिबात नाही. तेच स्वामी मंदिर आणि काश्मीरवही वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे भाजपचे समर्थक आणखी जवळ येऊ लागले आहेत. भाजपच्या समर्थकांचे मानस आर्थिक वस्तुस्थितीने घडत नाही. त्यांच्याकडे आता स्वदेशीचेही ढोंग नाही. मंदी आणि बेरोजगारीमुळे नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर भाजपच्या सदस्यत्वाची नवीन आकडेवारी पाहा. 7 कोटी नवीन सदस्य बनले आहेत. हे समजून घेतले पाहिजे की, राजकीय मानसाची जडणघडण आर्थिक कारणांवरच होणे गरजेचे राहिलेले नाही. नेहमी होत नाही. राजकीय मानसाच्या निर्मितीत नरेंद्र मोदींचे यश आहे. ते आर्थिक आघाडीवर अपयशी नेते गुजरातमध्येही होते आणि आजवर केंद्रातही राहिले आहेत. हे राजकीय मानस कोणत्या गोष्टींनी घडते, ते जीडीपीच्या 5 टक्के दराने त्याचा विचार करता कामा नये.

त्यामुळे अर्थव्यवस्था रूळावर येवो आणि सर्वांच्या नोकऱ्या वाचो, म्हणून प्रार्थना करा. मोदी विरोधक आणि मोदी समर्थक अशा दोघांच्याही नोकऱ्या!. नोकरी गेल्यानंतर मोदी समर्थकांकडे जगण्यासाठी अनेक बहाने आहेत. काश्मीर आहे, ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम’ आहे. मोदी विरोधकांकडे काहीच नाही. ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम’ही नाही!. त्यांचे ऐकूनही घेणाराही कुणी नसेल. त्यांच्यासाठी ही बेरोजगारी बिमारी घेऊन येणार आहे. त्यामुळे जीडीपीच्या घसरलेल्या आकड्यावर हसू नका !! (रविशकुमार यांनी हा लेख त्यांच्या कस्बा ब्लॉगवर लिहिला आहे.)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा