राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

0
168
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये जनता कर्फ्यू, नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन लावण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करणार का? असा प्रश्न कायम विचारला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. लॉकडाऊन लागू करण्याची सरकारची इच्छा नाही, मात्र नागरिकांनी नियमांचे पालन करून लॉकडाऊन टाळावा, असे ठाकरे म्हणाले.

राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी संपूर्ण राज्यात पुन्हा एखदा लॉकडाऊन करणार का? असा प्रश्न आज विधिमंडळ अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला. त्यावर संपूर्ण राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची सरकारची इच्छा नाही, असे स्पष्ट करतानाच कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि लॉकडाऊन टाळावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सचिन वाझे म्हणजे लादेन असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्नः मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सचिन वाझे हे पूर्वी शिवसेनेत होते. आता त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही. हल्ली एखादी घटना घडली की एखाद्याचे चारित्र्यहनन करायचे, त्याला आयष्यातून उठवायचे अशी पद्धत झालेली आहे. आधी चौकशी करायची नाही. त्याआगोदारच दोषी ठरवायचे असे कसे होऊ शकेल, असे ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा