कोरोनावर सीरमच्या लसीचा डोसः कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी

0
68
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः नवीन वर्षाचा पहिलाच दिवस भारतीयांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. कोरोना विषाणू संसर्गावर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिली आहे.

भारतीय औषध महानियंत्रक कार्यालय (डीजीसीए) आणि केंद्र सरकारच्या कोरोनावरील तज्ज्ञ गटाची आज दिल्लीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड विद्यापीठ,अस्त्राझेनेका कंपनीच्या सहकार्याने ही लस तयार केली आहे.

भारतीय औषध महानियंत्रक कार्यालय (डीजीसीए) आणि केंद्र सरकारच्या कोरोनावरील तज्ज्ञ गटाच्या या बैठकीत फायझर, भारत बायोटेक आणि सीरम या तिन्ही कंपन्यांना आपले प्रेझेंटेशन द्यायचे होते. या बैठकीत झायडस कॅडिलाही सहभागी झाली होती. सीरमचे प्रेझेंटेशन झाल्यानंतर कोविशिल्डच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व लस उत्पादकांनी त्यांची लस आणि त्या लसीचे होणारे परिणाम याबाबत या गटासमोर प्रेझेंटेशन दिले होते.

हेही वाचाः महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात होणार लसीकरणाचा ड्राय रनः जालना, नागपूर, पुणे, नंदूरबारची निवड

कोविशिल्ड लसीचे ८ कोटी डोज तयारः सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीचे ८ कोटी डोज आधीच तयार करून ठेवले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या म्हणण्यानुसार कोविशिल्ड ही लस सरकारला २०० ते २५० रुपयांत मिळू शकते. तर खासगी विक्रेत्यांना ही लस ५०० ते ६०० रुपयांत मिळू शकते. कोरोना विषाणूच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी या लसीचे दोन डोज घ्यावे लागणार आहेत.

पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांचे लसीकरणः कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात देशातील ३० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. लसीकरणाची जय्यत तयारी आधीच करून ठेवण्यात आली आहे. उद्या, शनिवारी देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये रंगीत तालीम होणार आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत ही रंगीत तालीम होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा