नंदूरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्र सरकारची मंजुरी

0
76
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नंदूरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मंजुरी दिली आहे.

केंद्र सरकार प्रायोजित योजनेअंतर्गत (सीएसएस) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे देशात १५७ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत आहेत. यातील ४० वैद्यकीय महाविद्यालये ही देशातील आकांक्षी जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येणार आहेत. आकांक्षी जिल्ह्यांच्या पहिल्या यादीत १६ जिल्ह्यांमध्ये ही महाविद्यालये उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून यात महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्याचा समावेश आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

केंद्र सरकार प्रायोजित योजनेअंतर्गत तीन टप्प्यांत देशात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येत असून आतापर्यंत ७० महाविद्यालये उभारण्यात आलेली आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज लेाकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा