खा. ओवेसी यांना आता सीआरपीएफची झेड श्रेणी सुरक्षा, म्हणालेः तुम्ही मारल्याने मी मरणार नाही!

0
208
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः एमआयएमचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर हापूर- गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर उत्तर हापूर येथे झालेल्या गोळीबारानंतर ओवेसी यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच केंद्र सरकारनेही या हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यांना तातडीने सीआरपीएफची झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

 उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावरून परतत असताना खा. ओवेसी यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींवरून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यातून खा. ओवेसी थोडक्यात बचावले. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी हापूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांची सध्या चौकशी सुरू आहे. या हल्ल्यात वापरण्यात आलेली हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने खा. ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. त्यांच्या जिविताला असलेला धोका लक्षात घेता त्यांना तातडीने सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय तातडीने लागू केला जाईल.

 दरम्यान, या हल्ल्यानंतर खा. ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी १९९४ पासून माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली आहे. आतापर्यंत मी कुठलीही सुरक्षा घेतलेली नाही. मला ते आवडतही नाही. भविष्यातही मी सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल, तेव्हा मी जाईन, असे सांगत खा. ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. आता केंद्र सरकारने त्यांना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. खा. ओवेसी ही सुरक्षा स्वीकारतात की नाही, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचाः किर्तनात ‘तमाशा’: बंडातात्या सातारा पोलिसांच्या ताब्यात, वादग्रस्त वक्तव्याची ‘झिंग’ अंगलट

तुम्ही मारल्याने मी मरणार नाही- ओवेसीः या हल्ल्यामागे कुणी तरी मास्टर माइंड असून निवडणूक आयोगाने त्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी खा. ओवेसी यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराजमधील धर्मसंसदेत माझे नाव घेऊन माझे गर्दन उडवण्याची भाषा करण्यात आली. माझ्या मरणाची वेळ ठरली आहे. तुम्ही मारल्याने मी कदापिही मरणार नाही, असे खा. ओवेसी यांनी म्हटले आहे. नेमके काय म्हणाले खा. ओवेसी पहा व्हिडीओ…

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

एमआयएमचे देशभर आंदोलनः दरम्यान, ओवेसी यांच्यावरील या हल्ल्याच्या निषेधार्थ एमआयएमकडून आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे. एमआयएमचे नेते खा. इम्तियाज जलील यांनी ट्विट करून या आंदोलनाची घोषणा कालच केली होती. खा. ओवेसींवरील हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जाईल आणि स्थानिक जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांना या बाबतचे निवेदन दिले जाईल. ओवेसींवरील हल्ल्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे खा. जलील यांनी जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा