सामान्य वीज ग्राहकांना कमीत कमी दरात वीज देण्यासाठी सरकार सकारात्मक: ऊर्जामंत्री

0
131

मुंबई : सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी, याबाबत सरकार सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या समवेत झालेल्या वीज दर प्रश्नासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते.

वीज दरासंदर्भात एमईआरसीकडे प्रस्ताव आला असून त्यासाठी जनसुनावण्या घेण्यात येतील. त्यामध्ये महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेलादेखील आपले म्हणणे मांडता येईल. तसे त्यांनी मांडावे. त्यानंतर एमईआरसी निर्णय घेईल. तो निर्णय शासनाकडे येईल. त्याबाबत शासन योग्य तो निर्णय घेईल. जो सामान्य वीज ग्राहकाच्या हिताचाअसेल असे मंत्री राऊत यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

संघटनेच्या वतीने कृषिपंप, वीज बिले, वीज दर व कृषी संजीवनी योजना तसेच औद्योगिक वीज ग्राहकांचे वीज दर, स्पर्धात्मक पातळीवर आणण्याबाबत उपाययोजना करणे, नवीन वीज दरवाढ प्रस्तावास स्थगिती देणेबाबत निवेदन देण्यात आले.  यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे व इतर पदाधिकारी तसेच ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक महावितरण असिमकुमार गुप्ता व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा