मराठा आंदोलनातील 460, कोरेगाव भीमा दंगलीतील 348 गुन्हे मागे : सरकारची घोषणा

0
176
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मराठा आरक्षण आंदोलनावेळी कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले 460 गुन्हे आणि कोरेगाव भीमा दंगलीत दाखल झालेले 348 गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत दिली. शेतकरी आंदोलनातील गुन्हेही लवकरच मागे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा प्रकरणी  एकूण 649 गुन्हे दाखल झाले  होते. त्यापैकी 348 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात 548 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 460 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणातील उर्वरित गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत. मात्र सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्याचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

 विरोधकांनी फडणवीसांनी शहरी नक्षलवादी संबोधलेः तत्कालीन फडणवीस सरकारने आपल्या विरोधात भूमिका घेणार्‍यांना शहरी नक्षलवादी संबोधले असा टोला लगावत देशमुख म्हणाले की, कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी चुकीच्या दिशेने झाली असेल तर पोलिस अ‍ॅक्ट किंवा राष्ट्रीय तपास संस्था कायद्याच्या कलम 10 नुसार महाराष्ट्र सरकार चौकशी करेल, असे आश्‍वासनही देशमुख यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा