राज्यपाल कोश्यारींनाही अर्णब गोस्वामींची चिंता, गृहमंत्र्यांशी केली प्रकृती आणि सुरक्षेबाबत चर्चा

0
179
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः वास्तुसजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब नाईक यांना अटक झाल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे नेते कमालीचे व्याकूळ आणि अस्वस्थ झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही अर्णब यांच्याबाबत चिंतेत आहेत.  त्यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुखांशी अर्णब गोस्वामींची प्रकृती आणि सुरक्षेबाबत चर्चा केली आणि गोस्वामींच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांकडे चिंताही व्यक्त केली.

हेही वाचाः अर्णब गोस्वामींसाठी पोलिसांवर दबाव टाकणारा फडणवीस सरकारमधील ‘तो’ ज्येष्ठ मंत्री कोण?

अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर प्रारंभी अलिबागेत कैद्यांसाठी बनवण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव अलिबागेतून तळोजा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये न्यायालयीन कोठडीत असतानाच अर्णब गोस्वामी यांनी मोबाइल वापरल्याचे आणि ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचेही समोर आले होते. त्यांना मोबाइल कुणी दिला? याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे त्यांना रविवारी अलिबागेतून तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.

हेही वाचाः अर्णब गोस्वामींकडे न्यायालयीन कोठडीत मोबाइल आलाच कसा?, चौकशी सुरु

अर्णब यांच्या अटकेनंतर भाजपने राज्यात आंदोलने केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना या अटकेच्या निषेधार्थ आंदोलने करा, मोर्चे काढा असे आदेशच दिले होते. त्यातच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही गृहमंत्री अनिल देशमुखांशी अर्णब गोस्वामी यांची प्रकृती आणि सुरक्षेबाबत चर्चा केली आणि त्यांच्या सुरक्षेबाबत चिंताही व्यक्त केली.

हेही वाचाः ४० पोलिसांच्या खास टीममे फत्ते केले ‘ऑपरेशन अर्णब’, गोस्वामी पळून जाण्याची होती भीती!

कोश्यारी यांनी गृहमंत्री देशमुखांना दूरध्वनी केला आणि अर्णब यांची सुरक्षा आणि प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. अर्णब यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचनाही राज्यपाल कोश्यारी यांनी गृहमंत्री देशमुखांना केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा