राज्यपाल कोश्यारी माफी मागा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाइलने धडा शिकवूः भानुसेंचा इशारा

0
142
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत केलेल्या ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?’ या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.  राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असून त्यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड त्यांना आपल्या स्टाइलने धडा शिकवेल, असा इशारा संघटनेचे प्रवक्ते शिवाजी भानुसे यांनी दिला आहे.

औरंगाबादेत रविवारी समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत समर्थ रामदासाशिवाय शिवाजीला कोण विचारेल?  असे कोश्यारी म्हणाले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत.

हेही वाचाः Video: समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?, राज्यपाल कोश्यारींचे औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य

रामदास हे छत्रपती शिवरायांचे गुरू नव्हते हे इतिहासतज्ज्ञांनी, अभ्यासकांनी सिद्ध केले आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ज्ञ, अभ्यासकांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीत बाबा पुरंदरेही होते. या समितीने रामदास हे शिवरायांचे गुरू नव्हते. एवढेच नव्हे तर छत्रपती शिवराय आणि रामदासाची भेटही झालेली नव्हती, असे अभ्यासाअंती सिद्ध केले आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 रामदास शिवरायांचे गुरू नव्हते. त्यांची भेट सुद्धा झालेली नाही. रामदास आणि शिवरायांचा काहीही संबंध नाही, असे २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केले होते. असे असतानाही महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी हे जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत आहेत. ते जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करत आहेत. त्यांनी तत्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड त्यांना संभाजी ब्रिगेडच्या स्टाइलने धडा शिकवेल, असा इशाराही भानुसे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा