ग्रामपंचायत निवडणूकः जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्जाची पोचपावती ग्राह्य धरणार

0
606
प्रातििनिधिक छायाचित्र.

मुंबई ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सोमवारी दिली

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी या निवडणूकांसाठी मतदान होणार असून निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ डिसेंबरपासून  स्वीकारली जाणार आहेत. तर ३० डिसेंबर २०२० पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल करताना जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागणार असल्याचे मदान यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा