ग्रेटा टूलकिट प्रकरणः बीडचा शंतनू मुळूक रडारवर, ट्रान्सिट बेलसाठी औरंगाबाद हाय कोर्टात केला अर्ज

0
594
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नोबेल पुरस्कार विजेत्या ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात बेंगळुरूची २१ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रविच्या अटकेनंतर दिल्ली न्यायालयाने मुंबईतील वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकब यांच्याबरोबरच बीड येथील अभियंता शंतनू शिवलाल मुळूक यांनाही अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत दिलासा देण्याची मागणी करणारा अर्ज त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केला असून या अर्जावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.

 दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांनी ही टूलकिट तयार केली आणि ती इतरांना एडिटिंगसाठी पाठवून दिली असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. शंतनू मुळूक हे बीड येथील रहिवाशी असून ते इंजिनिअर आहेत आणि एक एनजीओही चालवतात. या टूलकिट गुगल डॉकसाठी जो ईमेल आयडी वापरण्यात आला होता, तो शंतनू मुळुक यांचाच आहे, असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.

शंतनू, दिशा आणि निकिता या तिघांनी पोएटिक जस्टिट फाऊंडेशन या खलिस्तान समर्थक संघटनेशी समन्वय साधून ही टूलकिट तयार केली होती आणि तीच टूलकिट दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळावा म्हणून ग्रेटा थनबर्गशी ट्विटवर शेअर केली होती. भारताविरुद्ध असंतोष परवण्याचा ही टूलकिट शेअर करण्यामागे त्यांचा हेतू होता, असाही दिल्ली पोलिसांचा दावा आहे.

कॅनडास्थित पुनीत नावाच्या महिलेने या तिघांना पोएटिक जस्टिस फाऊंडेशन या बंदी घातलेल्या खलिस्तान समर्थक संघटनेच्या संपर्कात आणले. ११ जानेवारी रोजी त्यांची झूम मिटिंगही झाली. या झूम मिटिंगमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात सोशल मीडियावर बझ निर्माण करण्याबाबत त्यांनी चर्चा केल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.

दिशा रविला अटक झाल्यानंतर दिल्लीतील न्यायालयाने निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर शंतनू मुळुक यांनी ऍड. सतेज जाधव यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात ट्रान्सिट बेलसाठी अर्ज केला आहे. या अर्जावर उद्या मंगळवारी सुनावणी होणार आहे.

दिल्ली पोलिस बीडमध्येः शंतनूच्या चौकशी साठी दिल्ली पोलिसांची टीम बीड मध्ये दाखल झाली आहे. दिल्ली पोलिसांनी यावेळी बीडमधील आई वडिलांची चौकशी केली. तसेच बँकेत जाऊन खात्याचा तपशील घेतला आहे. शंतनूची नाहक बदनामी केली जात असून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणूनच हा गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप कुटुंबांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा