२३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक, जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई

0
108
प्रतिकात्मक छायाचित्र.

पुणे:  महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने २०० कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राज्य कर आयुक्त धनंजय आखाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही करण्यात येते. त्यानुसार आफताफ रेहमानी याच्यावर ही कारवाई करण्यात आली. मेसर्स अर्श स्टील कॉर्पोरेशन या कंपनीने वस्तू व सेवाकर कायदा २०१७  याअंतर्गत नोंदणी दाखला घेतला. या कंपनीच्या माध्यमातून आफताफ रेहमानी याने २०० कोटी रकमेची फक्त बिले देऊन ४१ कोटी ९५ लाखांचा आयटीसी (इनपुट टॅक्स क्रेडिट) पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी बोगस कंपनीकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकातून सुमारे २७  कोटी ७ लाख रकमेचा परतावा प्राप्त करून घेतला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुण्याचे अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त दत्तात्रय आंबेराव व सहाय्यक राज्यकर आयुक्त सचिन सांगळे यांच्या प्रयत्नातून ही अटक कारवाई करण्यात आली. विभागातर्फे ॲड. महेश झंवर यांनी काम पहिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा