जालना जिल्ह्यातील अनेक गावांना गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

0
37
प्रातिनिधिक छायाचित्र.

जालनाः जालना जिल्ह्यातील अनेक गावांना काल शुक्रवारी गारपिटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसराला गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची मोठी झळ बसली. हसनाबाद, तळेगाव, पिंप्री, विटा, रजाळा, कोपर्डा, राजूर, तपोवन या गावांसह देहेड, कोदोली आदी गावांतही शुक्रवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट झाली. त्यामुळे शेतात आणि परिसरात गारांचा खच पडला होता.

 अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतात सोंगणी करून ठेवलेला गहू, हरभरा, ज्वारी, कांदा सीडसह अंबा फळाचेही मोठे नुकसान झाले आहे. या आधीही तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा