ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला हर्ष लिंबाचिया ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा संवाद लेखक!

0
154
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाच्या घरात गांजा आढळल्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) या दोघांनाही अटक केली. या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून हर्ष लिंबाचिया हा ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा संवाद लेखक असल्याचे समोर आले आहे.

 अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले. शनिवारी सकाळी एनसीबीच्या पथकाने भारती सिंगच्या घरावर छापा टाकला. घराच्या झाडाझडतीत घरात गांजा आढळून आला. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी गांजा सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आता याच वरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाशी संबंधित आणखी एका व्यक्तीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हर्ष लिंबाचिया हा या चित्रपटाचा संवाद लेखक आहे. विवेक ओबेरायचा मेव्हणा आदित्य अल्वा याचाही ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग आहे, असे ट्विट सावंत यांनी केले आहे.

हर्ष लिंबाचिया याच्याखेरीज अनिरुद्ध वला आणि विवेक ओबेराय हेही या चित्रपटाचे संवाद लेखक आहेत. विशेष म्हणजे भारती सिंग ही भाजपची प्रचारक आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भारती सिंगने अमृतसर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अरूण जेटली यांचा प्रचार केला होता. त्यावेळी काँग्रेसकडून कॅप्टन अमरिंदर सिंग हे निवडणुकीच्या मैदानात होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा