हाथरस बलात्कार प्रकरणी औरंगाबादेत आंबेडकरी संघटनांची निदर्शने, योगींविरोधात घोषणाबाजी

0
83

औरंगाबादः उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय दलित तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळी असून त्याचे पडसाद आज औरंगाबादेतही उमटले. औरंगाबादेतील आंबेडकरी संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने करत उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध केला आणि न्यायाची मागणी केली.

हाथरस येथील दलित तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर उत्तर प्रदेशात पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांच्या सहमतीविनाच परस्पर अंत्यसंस्कारही उरकून टाकले. त्यानंतर कुटुंबाची मुस्कटदाबी केली आणि जवाब बदलण्यासाठी हाथरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कुटुंबाला धमक्याही दिल्या. योगी आदित्यनाथ सरकारने हे प्रकरण ज्या असंवेदनशीलतेने हाताळले, त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळी आहे.

आज औरंगाबादेत आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली. या निदर्शात शहरातील सर्व आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा