हाथरसच्या मुलीसाठी कोरोना काळातही दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो निदर्शक रस्त्यावर!

0
101
सौजन्यः twitter/@@AamAadmiParty

नवी दिल्लीः  उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या दडपशाहीविरोधात आज दिल्लीच्या जंतरमंतरवर शेकडो निदर्शक रस्त्यावर उतरले. हाथरसच्या ‘निर्भया’ला न्याय द्या अशी मागणी करत हजारो लोकांनी कोरोना काळातही जंतर मंतरवर निदर्शने केली.

 भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी इंडिया गेटवर निदर्शने करण्याचे आवाहन जनतेला केले होते. परंतु दिल्ली पोलिसांनी इंडिया गेटवर प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यामुळे हे आंदोलन इंडिया गेटपासून तीन किलोमीटर दूर असलेल्या जंतर मंतरवर हलवण्यात आले. या आंदोलनात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकही सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही या आंदोलनात सहभागी झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत हाथरसच्या बेटीला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हा आवाज बुलंद होत जाईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

सौजन्यः twitter/@nehadixit123

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा