सुंदर, मोहक हेझल डोळ्यांचे रहस्य

0
151
सौजन्यः पिंटरेस्ट

हेझल डोळे, डोळ्यांच्या रंगांपैकी सर्वाधिक रहस्यमय रंग. हेझल डोळे जेवढे अद्वितीय तेवढेच सुंदर. तसे पाहिले तर हेझल हा काही रंग नाही, तो बुबुळांतील रंगाचा एक पॅटर्न आहे. ज्या लकी लोकांना अशा डोळ्यांची निसर्गदत्त देणगी लाभली आहे, त्यांच्या बुबुळात तपकिरी, पिवळा, हिरवा आणि निळ्या रंगाचे मिश्रण पहायला मिळते. त्यामुळे हेझल डोळ्यांच्या कोणत्याही दोन जोड्या अगदी एकसारख्या नसतात. प्रत्येक डोळ्यांचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्ये असते आणि सुक्ष्मभेदही असतो.

असे हेझल डोळे असण्यामागे नेमके काय शास्त्र आहे? हेझल डोळे असणे सामान्य आहे की त्यामागे काही अनुवांशिक अपवाद आहे? एखाद्या व्यक्तीच्या परिवेशानुसार हेझल डोळे रंग का बदलतात?

हेझल डोळ्यांच्या रंग नेमका कसा असतो?

तपकिरी, बदामी, निळे आणि हिरवे डोळे असलेल्या लोकांच्या बुबुळात एकच रंग असतो. तर हेझल डोळ्यात अनेक रंगांच्या छटा असतात. हेझल डोळे रंगापेक्षाही बुबुळात रंगछटांची पसरण कशी झाली आहे, यावरच वैशिष्ट्येपूर्ण ठरतात. त्यात लक्षणीय वैविध्यही पहायला मिळते. डोळ्यातील बाहुलीभोवतीच्या रंगाच्या वर्तुळाने हेझल पॅटर्न सुरू होतो आणि डोळाभर पसरत जातो. हा रंग हिरवा होत जाईल आणि कधीकधी मध्येच पिवळसर- तपकिरी रंगाचे एखादे अतिरिक्त वर्तुळही घेत जाईल. प्रस्फोटासारखा हा पॅटर्नच हेझल डोळे हिरव्या डोळ्यांपेक्षा भिन्न ठरवतो. हिरव्या डोळ्यांमध्ये रंगछटांतील असा बदल नसतो. हेझल डोळ्यांत बाहुलीभोवत पिवळसर तपकिरी, गडद तपकिरी किंवा अम्बर ब्राऊन रंगछटा असू शकतात. अन्य रंगांच्या डोळ्यांमध्ये असे वैविध्य दिसत नाही.

विशेष म्हणजे हेझल डोळे कितीही वैविध्यपूर्ण दिसत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यात एकच रंग असतो. तो म्हणजे तपकिरी! हा तपकिरी रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यापासून येतो. याच मेलॅनिनमुळे एखाद्या व्यक्तीची त्वचा किती गडद की तेजस्वी हे ठरत असते. तुमच्या बुबुळात आणि तुमच्या त्वचेत जेवढे जास्त मेलॅनिन तेवढेच तुमचे डोळे आणि त्वचाही गडद दिसते. त्यातून बरेच काही स्पष्ट होते.

हेझल डोळ्यांच्या बुबुळात जर केवळ एकच रंग असेल तर मग आपणास ते हिरवे, पिवळे आणि काही वेळा निळसर का दिसतात? त्याचे कारण आहे मेलॅनिन. जे हेझल डोळे तपकिरी दिसतात, म्हणजे त्या व्यक्तीच्या बुबुळात भरपूर प्रमाणात मेलॅनिन आहे. जे हेझल डोळे पिवळे किंवा हिरवट दिसतात, याचा अर्थ मेलॅनिनचे प्रमाण कमी आहे आणि प्रकाश संमिश्र विखुरलेला आहे. आणि जर डोळे निळे असतील तर? त्याचा अर्थ बुबुळात, किमान बुबुळाच्या बाह्य थरात तरी मेलॅनिनचे प्रमाण अजिबातच नाही. आहे की नाही मजेशीर?

टीव्हीसमोर बसलं की तुम्हाला हेझल डोळे असलेल्या सुंदरी आणि पुरूष मोठ्या प्रमाणात जाहिराती आणि मालिकांमधून दिसतात.  वस्तुतः माध्यमांमधून हेझल डोळे असलेल्यांचे प्रतिनिधीत्व मर्यादेपेक्षा जास्तीचेच दाखवले जाते. हे वैशिष्ट्येपूर्ण डोळे असलेल्यांचे प्रमाण तेवढे अजिबात नाही. खरे तर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 5 टक्के लोकांचेच डोळे हेझल दिसतात. त्या तुलनेत जगातील 79 टक्के लोकांचे डोळे तपकिरी आहेत. विशेष म्हणजे जगाच्या लोकसंख्ये 8 ते 10 टक्के लोकांचे डोळे निळे आहेत. त्यापैकी बहुतांश लोक फिनलंड, इस्टोनिया, आयर्लंड आणि स्कॉटलंडसारख्या युरोपीय देशातच राहतात. त्यातही डोळ्यांचे तीन रंग खूपच दुर्मिळ आहेत. ते म्हणजे राखाडी डोळे, लाल डोळे आणि जांभळे डोळे. जगाच्या एकूण लोकसंख्ये एक टक्क्यांपेक्षाही कमी लोकांच्या डोळ्यांचा रंग या तीनपैकी एका रंगाचा आहे. त्यामुळे हेझल डोळे असलेल्या लोकांनो, स्वतःला धन्य समजा, तुम्ही खरेच दुर्मिळ आहात!

तुमचे डोळे हेझल असतील किंवा हेझल डोळे असलेल्या लोकांची वेगवेगळी छायाचित्रे तुम्ही पाहिली असतील तर हेझल डोळ्यांमधील रंगछटा कायम बदलत गेलेल्या दिसतात. एकाच व्यक्तीचे काही छायाचित्रांत डोळे एकदमच हिरवट दिसतील तर दुसऱ्या छायाचित्रांत ते पिवळसर किंवा तपकिरी दिसतील. त्यामागेही एक शास्त्र आहे. ऑऊलकेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, पर्यावरणातील घटकांनुसार हेझल डोळे रंग बदलतात. उदाहरणातील खोलीमधील वस्तुंचे रंग आणि बुबुळांवर पडणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण किती आहे आणि डोळ्यांमध्ये मेलॅनिनचे प्रमाण किती आहे, यावरून हेझल डोळ्यांच्या रंगछटा बदलतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात मेलॅनिनचे प्रमाण कमी असेल आणि त्या व्यक्तीने हिरव्या रंगाचा पोषाख घातला असेल तर त्याचे डोळे हिरवट रंगछटांचे दिसतील आणि डोळ्यात मेलॅनिनचे जास्त प्रमाण असलेल्या व्यक्तीने तपकिरी रंगाचा पोषाख घातला असेलत तर त्याचे डोळे जास्त तपकिरी रंगाचे दिसतील.

हेझल डोळे असणे ही सुंदर बाब असली तरी या सुंदर बाबीला लागून येणाऱ्या गोष्टी म्हणाव्या तितक्या चांगल्या नाहीत. तपकिरी रंग आणि हेझल डोळे असलेल्या महिला फिकट रंगाचं डोळे असलेल्या महिलांच्या तुलनेत दुःखाच्या बाबतीत खूपच संवेदनशील असतात. त्यांना दुःख अजिबातच सोसवले जात नाही. निळ्या रंगाचे डोळे असलेल्या पुरूषांना हेझल डोळे असलेल्या महिला आवडत नाहीत. निळ्या रंगाचे डोळे असलेल्या पुरूषांना निळ्या रंगाचे डोळे असलेल्या महिलाच जास्त आकर्षक वाटतात. उलट निळ्या रंगाचे डोळे असलेल्या महिलांना आपल्या जोडीदाराच्या डोळ्याच्या रंगाबद्दल फारशा आग्रही नसतात. त्यांना हेझल डोळे किंवा तपकिरी रंगाचे डोळे असलेलाही जोडीदार चालतो. असे आहे सुंदर, आकर्षक, मोहक हेझल डोळ्यांचे रहस्य!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा